नवी दिल्ली : देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात उलथापालथ सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका ग्राहकांना बसेल कारण त्यांच्या खिशावर या चढ-उताराचा परिणाम होईल. अशा परिस्थितीत सोने खरेदीचा प्लॅन करत असाल तर उशीर करू नका कारण सोने उच्चांकी पातळीवरून स्वस्त दरात उपलब्ध आहे. भारतीय सराफा बाजाराच्या तज्ञांनुसार सोन्याच्या किंमत खाली उतरल्या असताना उशीर न करता खरेदी करावे कारण आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढणार असे दिसत आहे.

सोने-चांदीचा आजचा नवीन भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा वायदा घसरणीसह तर चांदीचा वायदा वाढीसह उघडला. या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या फ्युचर्स किमतीत वाढीसह व्यवहारास सुरूवात झाली आहे. मौल्यवान धातूच्या फ्युचर्स किमती अलीकडेच झपाट्याने वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याचे वायदे ५९ हजार रुपयांच्या जवळ व्यवहार करत असता चांदीच्या वायदेने ७२ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती झाली आहे, तर चांदीच्या फ्युचर्सच्या किमती वाढ नोंदवली गेली आहे.

EPF सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट; फक्त एक चूक… अन् पेन्शन आणि 7 लाखांचा विमा गमावून बसाल
चांदीची चमक वाढली
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचे डिसेंबर वायदे (फ्युचर्स) २४३ रुपये वाढीसह ७२ हजार १८५ रुपयांवर खुला झाला तर दिवसाच्या व्यवहार सत्रात चांदीचे फ्युचर्स ७२ हजार २५० रुपयाचा दिवसाचा उच्चांक तर ७२ हजार १५४ रुपये प्रति किलो दिवसाचा नीचांक गाठला.

सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे!

लक्षात घ्या की मे महिन्यात चांदीचे प्रति किलो दर ७८ हजार रुपये, तर त्याच महिन्यात सोन्याच्या फ्युचर्स किमतीने ६१ हजार ८४५ रुपये प्रति १० ग्रॅमची उच्चांक पातळी गाठली होती. दुसरीकडे, गुडरिटर्न्सच्या ताज्या आकडेवारीनुसार २२ कॅरेट १० ग्रॅम ५४ हजार ८४० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोने ५९ हजार ८३० रुपयांवर स्थिर आहेत. तसेच चांदी ७४ हजार रुपये प्रति किलोवर घसरली आहे.

HDFC बँकेने कर्जाचे व्याजदर वाढवले, कर्जधारकांच्या खिशावरील बोजा वाढला; तुमचा EMI किती वाढणार?
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीत तेजी, सोन्याची घसरण
दुसरीकडे, जागतिक बाजारात सोन्या-चांदीत संमिश्र व्यवहार होत आहेत. सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती घसरणीसह उघडल्या असताना चांदीच्या फ्युचर्सच्या किंमतीत वाढ झाली. कॉमेक्सवर सोने १९४५.६० डॉलर प्रति औंसवर उघडले. कॉमेक्सवर चांदीचे फ्युचर्स $२३.३९ वर उघडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here