मुंबई: करोनाच्या संसर्गाशी नेटाने लढणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारची चिंता वाढवणारी बातमी आहे. सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागण झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर सर्व आमदारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तनपुरे यांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. तनपुरे यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. पुरेशी काळजी घेत होतो. मात्र, कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. करोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तनपुरे करोना काळात आपल्या मतदारसंघात, जिल्ह्यात आणि राज्यातही दौरे करीत होते. त्यांच्या उपस्थिती विविध उपक्रम, बैठका पार पडल्या. मतदारसंघासोबतच नगर शहरातही ते सक्रिय होते. अंतिम वर्ष परीक्षा विषयात त्यांनी सुरुवातीपासून लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ऐन अधिवेशानाच्या वेळी त्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने त्यांना अधिवेशनात भाग घेता आला नाही.

वाचा:

राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. सर्वप्रथम गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अस्लम शेख यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांनीच करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मंत्र्यांशिवाय अनेक आजी-माजी आमदार, खासदारांनाही करोनाने गाठले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here