मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी म्हणजेच सोमवारी हिताची एनर्जीचे शेअर्समध्ये तेजी कायम राहिली. स्टॉक मार्केटचा मल्टीबॅगर हिताची एनर्जीचा शेअर गेल्या शुक्रवारीही वाढीसह बंद झाला होता, तर सोमवारी सकाळी शेअर १.९२% उसळीसह ४,६५५.४५ रुपयांवर व्यवहार करत होता. आयना रिन्युएबल पॉवरकडून कंत्राट मिळाल्यानंतर हिताची एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी उडी घेतली आहे.

हिताचीचा मल्टीबॅगर स्टॉकगेल्या तीन वर्षांत हिताची एनर्जीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आणि एक लाख रुपये गुंतवलेला गुंतवणूकदारही करोडपती झाले आहेत. त्याच वेळी, गेल्या पाच महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना ५०% नफा दिला असून हा स्टॉक भविष्यातही कमाई करेल असा अंदाज बाजार तज्ञांनी व्यक्त केला आहे.

अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या शेअरने छप्परफाड कमाई, 18 पैशांच्या स्टॉकने बनवले करोडपती
१९ हजार ३५९ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४८०० रुपये तर ५२ आठवड्यांचा नीचांक २८४० रुपये आहे. हिताची एनर्जी लिमिटेड पूर्वी ABB पॉवर उत्पादने म्हणून ओळखली जात होती ज्याची स्थापना २०१९ मध्ये करण्यात आली होती. हिताची एनर्जी प्रकल्प, डिझाइन आणि अंमलबजावणीमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत आपली मजबूत उपस्थिती प्रस्थापित करत असून आता कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम व्यवस्थापन पॅकेजवर देखील काम करत आहे.

छोट्या शेअरची मोठी कमाल! तीन वर्षात 1100% परतावा दिला, स्टॉक सुसाट तेजीत; खरेदी करणार का?
हिताची एनर्जी गुंतवणूकदार करोडपती
पॉवर एनर्जी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहेत. गेल्या तीन वर्षांत या स्टॉकने ३०,५९५% बंपर परतावा दिला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी या शेअरचा भाव फक्त १५ रुपये होता, जी आता ४,६५५ रुपयेजवळ पोहोचला आहे. यासोबतच गेल्या पाच महिन्यांत शेअरने गुंतवणूकदारांना ५०% परतावा दिला आहे. १९ एप्रिल रोजी हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडचे शेअर्स ३०४५ रुपये या वर्षाच्या नीचांकी पातळीवर होती, तर आता या शेअरच्या किंमतीत यावर्षीच्या नीचांकीपेक्षा दुप्पट वाढली आहे.

40 वर्षांपूर्वी खरेदी केलेले शेअर्स विसरले, आज किंमत 1448 कोटी रुपये पण दुर्दैव; पाहा संपूर्ण प्रकरण
हिताची एनर्जी शेअरमधील वाढीचे कारण काय?
आयना रिन्युएब पॉवरकडून कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे ज्यामध्ये 300MW चा सोलर फोटोव्होल्टेइक पॉवर प्लांट बांधला जाईल, असे हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडने शेअर बाजाराला कळवले आहे. हिताची एनर्जीला राजस्थानमधील बिकानेर येथे ग्रिड कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी करार मिळाला असून हा प्रकल्प मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करायचा आहे. दरम्यान, मोठा प्रकल्प मिळाल्यापासून कंपनीचे शेअर्स उसळी घेत आहेत.

(Disclaimer: तुम्हाला यापैकी कोणत्याही मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन जबाबदार राहणार नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here