यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, “केंद्र शासनाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. जाती-धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला जात आहे. धनगर, मराठा आरक्षण यावरून राज्य पेटले आहे. मराठा बांधवांना मारहाण, वारकऱ्यांवर लाठीचार्ज असे उद्योग या सरकारच्या काळात केले जात आहेत”.
विशाल पाटील म्हणाले, “निवडणुका जवळ येत असल्यानेच तुम्ही निवडून दिलेले खासदार तुमच्याजवळ येत आहेत. बाकी काम शून्य असणारे खासदार आहेत. संसदेत एकही प्रश्न मार्गी लावला नाही. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो म्हणूनच तुम्ही दुसऱ्याला निवडून दिले. मात्र, यापुढे कमी पडणार नाही” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काँग्रेसच्या विराट पदयात्रा
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे यांनी नाशिक येथे, विधान परिषदेतील गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर, सांगली येथे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, परभणी येथे माजी मंत्री अनिल पटेल, नंदूरबार येथे माजी मंत्री के. सी. पाडवी, माजी मंत्री वसंत पुरके यांनी गडचिरोली येथे, पिंपरी चिचवड शहरात आमदार रविंद्र धंगेकर यांनी, भंडारा येथे नाना गावंडे, धुळे येथे प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, माजी मंत्री अनिस अहमद यांनी भिवंडी येथे, हिंगोली येथे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे, पुणे येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पद यात्रा काढली. यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत भारत जोडो यात्रा काढण्यात आल्या. या यात्रेंमध्ये काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाले होते.