या प्रकरणात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कौटुंबिक कराणावरून पती तरबेज जावेद सय्यद (रा. फुलेनगर, जामा मस्जीद जवळ पंढरपूर) सोबत वाद झाल्यानंतर सासर सोडून ती माहेरी आई-वडिलांकडे राहण्यास आले. ती माहेरी असताना तिचा पती तबरेज याने तिला फोनवरून धमकी दिली, तुला सोडणार नाही. तुझी समाजात बदनामी करीन. माझ्याकडे तुझे फोटो असून ते नातेवाइकांनाही पाठवीन.
तरबेज सय्यद या महिलेच्या पतीने त्याच्यासोबत पत्नीचे असलेले जुने आक्षेपाहार्य फोटो वडिलांच्या व्हॉट्सअपवर आणि इतर नातेवाईकांच्या व्हॉट्सअपवर पाठविले. त्यामुळे समाजात बदनामी झाली. पत्नीच्या तक्रारीवरून पती तरबेज जावेद सय्यद याच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.