तुमच्या सर्व प्रयत्नांनंतरही पैशाची नोट ओली झाली किंवा गळून फाटली तर ती कोणत्या कामाची नाही असे समजू नका. दोन तुकड्यांमध्ये मोडलेली तुमची नोटही पूर्ण मूल्याची राहते. एवढेच नाही तर तुमच्या नोटेचा कोणताही भाग फाटला आणि हरवला तरी तुमचे पैसे तुमच्या कामी येतीलच. बँक ग्राहकांच्या हितासाठी रिझर्व्ह बँकेने २ जुलै २०१८ रोजी फाटलेल्या नोटा बदलण्याबाबत एक परिपत्रक जारी केले ज्यांतर्गत ग्राहक कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन त्यांच्या फाटक्या नोटा बदलून घेऊ शकतात, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, प्रत्येक नोटेची किंमत त्याच्या स्थिती आणि मूल्यानुसार ठरवली जाते. रिझव्र्ह बँकेने यासाठीचे सूत्रही ठरवले असून प्रत्येक मूल्याच्या स्वच्छ आणि नवीन नोटा जारी केल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे.
काय आहे बँकेत नोट बदलण्याचा फॉर्म्युला
१० रुपयांच्या वर आणि ५० रुपयांच्या खालच्या नोटा ५० टक्के जरी खराब झाल्या, तर तुम्हाला पूर्ण मूल्य दिले जाईल. तसेच नोट दोन भागात विभागली गेली असेल आणि ४०% नोट खराब असली तर तुम्हाला ५०% रक्कम परत मिळेल. यासोबत एखादी व्यक्ती एकावेळी २० नोटा किंवा पाच हजार रुपयांच्या नोटा बदलू शकते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच यापेक्षा जास्त मूल्य असल्यास ग्राहकाला एक पावती दिली जाईल आणि पैसे नंतर त्याच्या खात्यात हस्तांतरित केले जातील.
कोणत्या चलनी नोटा बदलता येणार नाही
आरबीआयच्या मास्टर सर्क्युलरनुसार, जर एखादी नोट जळाली असेल किंवा तिचा महत्त्वाचा भाग फुटून गायब झाला असेल किंवा अर्ध्याहून अधिक भाग अनेक तुकड्यांमध्ये विभागून नष्ट झाला असेल तर कोणतीही बँक अशी नोट बदलून देणार नाही. दुसरीकडे, लक्षात ठेवा की नोटा बदलण्यासाठी तुम्हाला खाते उघडण्याची गरज नसून जर उच्च मूल्याच्या फाटलेल्या नोटा असतील तर पैसे थेट ग्राहकाच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. याशिवाय जर बँकेला शंका आली की नोटा जाणूनबुजून फाडल्या गेल्यात तरीही त्या बदलल्या रिफंड मिळणार नाही.