नोएडा: उत्तर प्रदेशच्या नोएडातील सेक्टर ३० मधील डी-४० बंगला गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टात वकिली करणाऱ्या रेणू सिन्हा यांची हत्या या बंगल्यात झाली. हत्या प्रकरणात त्यांचा पती नितीन सिन्हा अटकेत आहे. नितीन सिन्हा २४ तास बंगल्यातील स्टोअर रुममध्ये लपला होता. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे.

बंगला विकण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू होते. त्याच वादातून पत्नीची हत्या केल्याची कबुली नितीन सिन्हानं पोलिसांकडे दिली. सिन्हा माजी आयआरएस अधिकारी आहे. नितीनला त्याचा बंगला अंत्येष भंडारी नावाच्या व्यक्तीला विकायचा होता. त्यासाठी ५ कोटी ७५ लाख रुपये इतकी रक्कम ठरली. नितीननं ८० लाख रुपये ऍडव्हान्स घेतले होते. मात्र रेणूचा या व्यवहाराला विरोध होता.
जुन्या घराच्या पाडकामावेळी सापडला खोका; उघडताच मजुरांची बोबडी वळली, काम टाकून पळाले अन् मग..
पोलिसांनी नितीनला स्टोअर रुममधून अटक केली. त्यावेळी नितीनजवळ डेबिट आणि क्रेडिट कार्डसोबतच पासपोर्टदेखील होता. तो ब्रिटनला पळून जाण्याच्या तयारीत होता. पण त्याला व्हिसा मिळू शकला नव्हता. गळा दाबून रेणूची हत्या केल्याचं नितीननं पोलीस चौकशीत सांगितलं. हत्येपूर्वी दोघांमध्ये बाचाबाची झाली. रेणू सिन्हा यांना हाडांचा कर्करोग होता. त्यामुळे पती-पत्नी वेगवेगळ्या खोलीत झोपायचे.

रेणू सिन्हा यांची हत्या केल्यानंतर नितीननं अंत्येष भंडारी आणि एका प्रॉपर्टी ब्रोकरला घरी बोलावलं. त्यांना बंगला दाखवला. मात्र तो त्यांना वरच्या मजल्यावर घेऊन गेला नाही. कारण वरच्या बाथरुममध्ये रेणूचा मृतदेह होता. अंत्येषनं दिलेल्या माहितीनुसार, नितीन बराच घाबरला होता. पण त्यानं हत्या केली असेल असा विचारही आमच्या मनात आला नाही.
धावत्या कारमध्ये LPG सिलिंडरचा स्फोट, तरुण जिवंत जळाला; बॉडी सीटला चिकटून, छत १० फुटांवर
नितीननं पूर्ण नियोजन करुन पत्नीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. ‘आम्ही बंगल्यात पोहोचलो, त्यावेळी रेणू यांच्या खोलीतील एसी २० वर होता. रेणू यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या एसी २४ वर ठेवायच्या. कारण त्यांना बोन कॅन्सर होता. पण नितीननं जाणूनबुजून एसी कमी तापमानावर ठेवला. नितीन बहुधा बंगल्याचे पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. मृतदेहाचा दुर्गंध पसरु नये म्हणून त्यानं एसीचं तापमान कमी ठेवलं होतं,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here