मोरे यांचे नातेवाईक रुग्ण दक्षिण पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात करोनावर उपचार घेत होते. त्यांचा रविवारी उपचारादरम्यान दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ॲम्बुलन्स वारंवार मागणी केल्यानंतरही ती वेळेत उपलब्ध झाली नाही. मोरे यांनी स्वतः ॲम्बुलन्ससाठी पाठपुरावा केल्यानंतर काही वेळाने ती उपलब्ध झाली. तसेच रात्री साडेआठच्या दरम्यान त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपण नगरसेवक असतानाही महापालिका अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल तर, सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला आहे.
वाचा:
मोरे यांनी सोमवारी महापालिकेचे उपायुक्त नितीन उदास यांच्याकडे झालेल्या घटनेचा जाब विचारला तसेच, त्यांच्या सरकारी ॲम्बेसिडर वाहनाची तोडफोड केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times