नवी दिल्ली : ऑफिसची मीटिंग असो किंवा गर्लफ्रेंडसोबतची प्रेमळ भेट… कॅफे कॉफी डे (CCD) आजही कित्येकांचा आवडता पर्याय आहे. पण मागील काही दिवसांपासून हा ब्रँड अडचणीत सापडला आहे. कंपनीवर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा असून CCD चे ऑपरेटर, कॉफी डे ग्लोबल कॉर्पोरेट दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जात आहेत.

कंपनीच्या सात उपकंपन्या – कॉफी डे ग्लोबल, टँगलिन रिटेल रिॲलिटी डेव्हलपमेंट्स, टँगलिन डेव्हलपमेंट्स, गिरी विद्युत लिमिटेड, कॉफी डे हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, कॉफी डे ट्रेडिंग आणि कॉफी डे इकॉन यांच्यावर मार्च २०२२ पर्यंत ९६० कोटी रुपयांचे कर्ज असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कंपनीला उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी कंपनीचा सीईओ मालविका हेगडे यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

मराठी उद्योगजगताचे शिलेदार; सायकलच्या दुकानापासून सुरुवात करून उभा केला हजारो कोटींचा उद्योग
नोकरी सोडून कंपनी सुरू केली
कॅफे कॉफी डे किंवा CCD म्हणून प्रसिद्ध ब्रँडची स्थापना VG सिद्धार्थ यांनी १९९६ साली केली होती. स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम करणाऱ्या सिद्धार्थने यापूर्वी कॉफीचे मळे घेतले होते. शेअर बाजारातून कमावलेल्या पैशांनी त्यांनी कॉफी डे ग्लोबल लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली आणि ११ जुलै १९९६ रोजी बेंगळुरू येथे CCD चे पहिले आउटलेट उघडले. हा तो काळ होता जेव्हा भारतीय तरुणांमध्ये कॉफीची क्रेझ वाढत होती आणि याच क्रेझमुळे CCD चा व्यवसाय वाढण्यास मदत झाली. कॅफे कॉफी डे, एक स्टार्टअपचे मूल्य काही वर्षांत ८ हजार कोटी रुपये झाले.

या चुकांमुळे CCD बुडाली
२००२ पर्यंत कंपनीने अपेक्षित नफा देण्यास सुरूवात केली. तर २०१५ मध्ये सिद्धार्थ पुन्हा एकदा शेअर बाजारात उतरण्याची तयारी करत होते. शेअर बाजाराबरोबरच त्यांनी रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही हात आजमावला, पण त्यांची जादू सगळीकडे चालू शकली नाही. कंपनीचा तोटा आणि कर्ज दोन्ही वाढू लागले. एका व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कंपनीने सर्वत्र हातपाय पसरायला सुरुवात केली, जी त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. परिणामी कर्जाचा बोजा वाढत गेला आणि उरली सुरली पोकळी करचुकवेगिरीने भरून काढली.

एकेकाळी ६५ रुपये होता पगार, १३ हजार रुपयांत उघडलं आईस्क्रिमचं दुकान; हजारो कोटींचा टर्नओव्हर
VG सिद्धार्थ यांची आत्महत्या
२०१७ मध्ये जेव्हा प्राप्तिकर विभागाने ७०० कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीचा आरोप केला ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. एका बाजूला कर्जाचे डोंगर आणि दुसरीकडे आयकराचा दबाव कंपनीचे मालक व्हीजी सिद्धार्थ सहन करू शकले नाहीत. २०१९ पर्यंत कंपनी ६५५० कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबली गेली होती. सिद्धार्थ यांनी २०% शेअर्स विकून ३२०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले, परंतु व्यवसायावरील वाढता दबाव ते सहन करू शकला नाही आणि त्यांनी आत्महत्या करून आपला जीव दिला.

मुलींसाठी सायकल बनवणाऱ्या कंपनीनं कुटुंबातील महिलांचे हक्क नाकारले; मुलगी लढली अन् जिंकली
कर्जबाजारी कंपनीची धुरा पत्नीकडे

पतीच्या निधनानंतर पत्नी मालविका हेगडे यांनी हिंमत गमावली नाही आणि कंपनी वाचवण्यासाठी हातपाय मारू लागल्या. ३१ डिसेंबर २०२० रोजी पतीच्या निधनानंतर मालविका यांनी CCD चे सीईओ म्हणून पदभार सांभाळला आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. मालविका हेगडे या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएस कृष्णा यांच्या कन्या आहेत. कंपनी सांभाळण्यात व्यस्त मालविकाने अमेरिकन कंपनी ब्लॅकस्टोन आणि श्रीराम क्रेडिट कंपनीसोबत करारही करत आपल्या कर्मचाऱ्यांना विश्वास दिला आणि आउटलेट सुधारण्याचे काम केले.

भोवऱ्यात अडकलेल्या कंपनीला वाचवू शकणार मालविका?
दिवाळखोरी आणि नादारी संहितेच्या कलम ७ अंतर्गत कॅफे कॉफी डे विरोधात अर्ज दाखल करण्यात आले असून २२८ कोटींच्या थकबाकीच्या प्रकरणात हे प्रकरण NCLT समोर पोहोचले असताना आता ब्रँडला पुन्हा एकदा कर्जाच्या संकटातून वाचवण्याचे खडतर आव्हान मालविकासमोर आहेत. तथापि यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा, अमर्त्य हेगडे देखील कंपनी वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे जो वडिलांचा वारसा वाचवण्यासाठी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट हाताळत आहे. आता मालविका या संकटातून बाहेर पडून कॅफे कॉफी डेला पूर्वीच्या स्थितीत आणू शकेल का? हे पाहायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here