वसई: विवाहबाह्य प्रेम संबंध असलेल्या विवाहित प्रियकराने त्याच्या प्रेयसी तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नायगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकराला नायगाव पोलिसांनी अटक केली आहे. नायगाव पूर्वेकडील सनटेक सोसायटी येथील रहिवासी नयना महत ही २९ वर्षीय तरुणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत होती. इंडस्ट्रीमध्ये काम करतानाच तेथेच काम करत असलेल्या कॉस्ट्युम डिझायनर मनोहर शुक्ला यांच्यासोबत तिचे प्रेम संबंध जुळून आले. मनोहर याचेमागील पाच वर्षांपासून नयनासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र मनोहर हा विवाहित असल्याचे समजल्यानंतर तिने हे संबंध तोडले आणि त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

नयनाची बहीण हिने १२ ऑगस्ट रोजी तिच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नयनाचा फोन बंद होता आणि तिच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिच्या बहिणीने नयना बेपत्ता असल्याबाबत नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणी पोलिसांनी तपास करण्यासाठी नायगाव पोलिसांनी नयनाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर मनोहर शुक्ला याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.

जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर…
मनोहर शुक्ला याने नयनाची हत्या करुन मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी सुटकेसमध्ये भरून मृतदेह गुजरात राज्यातील वलसाड येथे फेकून दिल्या असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपी मनोहर शुक्ला याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात नायगाव पोलिस ठाण्यात भांदवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

मनोहर शुक्ला विवाहित असल्याचे समजल्यानंतर नयना महतने त्याच्याशी संबंध तोडले आणि त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी मनोहर शुक्ला तिच्यावर दबाव टाकत होता, त्यामुळे ही हत्या करण्यात आल्याची शक्यता नायगाव पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या तपासात ज्या इमारतीत नयना रहात होती, त्या इमारतीचचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असून त्यात मनोहर शुक्ला सुटकेस घेऊन जाताना दिसत असून त्याची पत्नी देखील यावेळी त्याच्यासोबत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याप्रकरणी मनोहर शुक्ला यांच्या पत्नीला देखील आरोपी केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here