ठाणे : मुंब्रा रेतीबंदर परिसरात ठाणे पोलिसांना स्फोटकांचा साठा सापडला आहे. खाडीपाञात सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी हे साहित्य वापरले जाणार होते. त्याआधीच पोलिसांनी कारवाई करून हा सगळा साठा जप्त केलेला आहे. गणेशोत्सवापूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मुंब्रा रेतीबंदर येथे १६ जिलेटिन कांड्या आणि १७ डिटोनेटर दोन पाडवांमध्ये मंगळवारी दुपारी सापडले. या खाडीपाञात सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी हे साहित्य वापरले जाणार होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा साठा हस्तगत केला.

मुंब्रा रेतीबंदर येथे सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करणारे पाडाव स्थानिक मच्छीमारांनी पकडले. यातील दोन पाडवांमध्ये संशयास्पदरित्या जिलेटीन व डिटोनेटरही आढळून आले आहे. पोलिस, संबंधित यंञणा आणि ठाणे तालुका पाणथळ समिती सदस्य रोहित जोशी यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

आई आजारी, उपचाराला पैसे नाहीत, व्यवसायिकाच्या मुलाचं अपहरण केलं, पण पोलिसांनी सूत्रे फिरवली-आरोपी जाळ्यात
काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. ज्या ठिकाणी या जिलेटिन कांड्या पोलिसांना मिळाल्या, त्याच परिसरात विसर्जन सोहळा असतो. खाडीत २ बार्ज आढळून आले असून त्या कोणाच्या मालकीचे आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी ठाणे पोलीस, कळवा पोलीस, मुंब्रा पोलीस, महसूल अधिकारी, जिल्हा प्रशासन, गुन्हे शाखा टीम दाखल आहे.

जरांगे पाटील तुमच्यासारख्या हिऱ्याचं आरोग्य धोक्यात आलं तर समाजाचं खूप नुकसान होईल, रोहित पवार यांची हात जोडून विनंती
राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. मंगळवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशभक्तांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. मोठ्या गणेशमंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे. त्यासाठी ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी कंबर कसलेली आहे.

जरांगेंचं उपोषण स्तुत्य आणि योग्य, शिवप्रतिष्ठान त्यांच्या पाठिशी; संभाजी भिंडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here