अहमदनगर: गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका मजुराला लाथा बुक्क्यांनी, दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव गाव येथील कमानीजवळ घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सावत्र बापाचे अमानुष कृत्य! ४ वर्षाच्या चिमुकल्याला सिगारेटचे चटके; आजीने जाब विचारताच…
मिळालेल्या माहितीनुसार, दिपक दादा गांगुर्डे (४०) असे मयत मजुराचे नाव आहे. दरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दिपक गांगुर्डे यास ग्रामीण रूग्णालय येथे पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. दरम्यान दिपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यात म्हटले आहे की, येसगाव तालुका कोपरगाव येथील दीपक दादा गांगुर्डे (४०) मजुरी (गवंडी काम) याचे आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड यांना गवंडी कामाचे मजुरीचे राहिलेले पैसे मागितले. या कारणावरून आरोपींना त्याचा राग आला. त्यानंतर तिघांनी शिवीगाळ करून आणि लाथा बुक्क्याने दगडाने मारहाण करून आरोपी अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड याने त्याचे हातातील लाकडी दांड्याने दिपकच्या डोक्यात तसेच शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण केली. यात जबर जखमी करून त्याचा खून केला आहे.

शिंदेंच्या सभेआधी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक; आंदोलन करण्यापुर्वी पोलिसांच्या ताब्यात

तसेच फिर्यादी आणि फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड सर्व राहणार येसगाव तालुका कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा ४४१/२०२३ भा द वि कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here