मोनू मानेसर याच्या अटकेविषयी हरियाणाच्या एडीजी कायदा आणि सुव्यवस्था ममता सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मोनू मानेसर यानंल २८ ऑगस्टला सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. सोशल मीडिया सनियंत्रण करणाऱ्या पथकाला ती आक्षेपार्ह वाटली. त्यानंतर पोलिसांनी नूंह हिंसाचार प्रकरणी अटक केली. हरियाणा पोलीस चौकशीनंतर ज्या राज्यांमधील पोलिसांना मोनू मानेसरची चौकशी करायची आहे त्यांना ताबा देतील. ज्या राज्यांच्या पोलिसांना मोनू मानेसरची कोठडी हवी आहे ते कोर्टाकडून त्याची कोठडी घेतील, असं मोनू मानेसर म्हणाला.
एडीजी ममता सिंह यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ज्या राज्यांमध्ये मोनू मानेसर विरोधात एफआयआर दाखल झालेली आहे त्या सर्वांना याची माहिती देण्यात आली आहे. गुरुग्राम पोलीस आणि राजस्थान पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.
राजस्थान पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार हरियाणा पोलिसांकडून आयटी कायद्यानुसार जामीन मिळणाऱ्या कलमामध्ये अटक केली आहे, असं सागंण्यात आलं. त्यामुळं राजस्थान पोलीस नसीर आणि जुनैद यांच्या हत्येकप्रकरणी मोनू मानेसरला ताब्यात घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राजस्थान पोलिसांना नसीर आणि जुनैदच्या हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी मोनू मानेसर असल्याचा संशय आहे.मोनू मानेसर उर्फ मोहित यादव हा बजरंग दलाचा सदस्य आणि गौरक्षक आहे.तो गुरुग्राम जवळच्या भागाती आहे. हरियाणात बजरंगदलाचं गाय संरक्षण टास्क फोर्स आहे. त्याचा तो प्रमुख असल्याची माहिती आहे.
३१ जुलाई २०२३ ला हरियाणात झालेल्या नूंहमधील हिंसाचार प्रकारणात मोनू मानेसरचं नाव आहे. मोनू मानेसरसह बिट्टू बजरंगीचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हरियाणा पोलीस त्यांची चौकशी संपल्यानंतर मोनू मानेसरला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात सोपवतील, अशी माहिती आहे.