बीकेसी मार्गावरील डायमंड जंक्शन ते जेएसडब्ल्यू कार्यालय आणि बीकेसी रोड प्लॅटीना जंक्शन ते मोतीलाल नेहरूनगर ट्रेड सेंटर दरम्यानच्या रस्त्यांवरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोडने डायमंड जंक्शन येथून डावे किंवा उजवे वळण घेऊन जेएसडब्ल्यू कार्यालय, खेरवाडी परिसरात जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्याचबरोबर खेरवाडी परिसर, एशियन हार्ट रुग्णालय, जेएसडब्ल्यू कार्यालयाकडून एमएमआरडीए कार्यालय आणि जे. कुमार यार्ड येथून उजवे वळण घेऊन डायमंड जंक्शन, बीकेसी परिसरात जाणाऱ्या सर्व वाहनांसाठीही रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोडने स्ट्रीट क्र. १० प्लॅटीना जंक्शन येथून डावे तसेच उजवे वळण घेऊन ट्रेड सेंटर मोतीलाल नेहरूनगरच्या दिशेने जाण्याचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ट्रेड सेंटर, मोतीलाल नेहरू नगरकडून प्लॅटीना जंक्शन बीकेसी रोडकडे बीकेसी फायर स्टेशन येथून पुढे बीकेसी परिसरात जाणाऱ्या वाहनांही प्रवेशबंदी आहे, असे वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त प्रज्ञा झेडगे यांनी सांगितले.
हे असतील पर्यायी मार्ग…
– एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोडने डायमंड जंक्शन येथून जेएसडब्ल्यू कार्यालय, खेरवाडी परिसर दिशेने जाणाऱ्या वाहनांना डायमंड जंक्शन नाबार्ड जंक्शन उजवे वळण घेऊन एशियन हार्ट रुग्णालय येथुन पुढे जेएसडब्ल्यू कार्यालय व खेरवाडी परिसरात जाता येईल.
– खेरवाडी परिसर, एशियन हार्ट रुग्णालय, जेएसडब्ल्यू कार्यालयाकडून जाणाऱ्या वाहनांना एशियन हार्ट रुग्णालय- नाबार्ड जंक्शन येथून डावे वळण घेऊन डायमंड जंक्शन व बीकेसी परिसरात जाता येईल.
– एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोडने मोतीलाल नेहरूनगरकडे जाणाऱ्या वाहनांना एमटीएनएल जंक्शनवरून डावीकडे वळून ट्रेड सेंटर, येथून मोतीलाल नेहरूनगरकडे जाता येईल.
– मोतीलाल नेहरूनगर, ट्रेड सेंटरवरून प्लॅटीना जंक्शन बीकेसी परिसरात जाणारी सर्व वाहने ट्रेड सेंटर येथून डावे तसेच उजवे वळण घेऊन एमटीएनएल जंक्शनवरून पुढे प्लॅटीना जंक्शन व बीकेसी परिसरात मार्गस्थ होऊ शकतील.