वाचा:
गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी पाचशेपेक्षा जास्त बाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता चिंतेत भर पडू लागली आहे. त्यातच आता जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात नागरिकांनीच पुढाकार घेऊन तालुका सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा:
करोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आज राहुरीमध्ये लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला बाजार समिती सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम, राहुरी नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुऱ्हे, राहुरी नगर पालिकेचे सर्व नगरसेवक, राहुरीचे व्यापारी, विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. या बैठकीत लॉकडाऊन बाबत सविस्तर चर्चा झाली. अनेकांनी त्यांचे विचार मांडले. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अनेकांचे मत हे लॉकडाऊन करावा, असे आले. त्यामुळे येत्या गुरुवारपासून (१० सप्टेंबर) ते १७ सप्टेंबरपर्यंत राहुरी तालुका लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात भाजीपाला, दूध व इतर अत्यावश्यक सोयी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
वाचा:
४६ गावांमध्ये आहे कंटेनमेंट झोन
राहुरी तालुक्यात एकूण ९६ गावे आहेत. या ९६ गावांपैकी तब्बल ४६ गावांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आजही निम्मा तालुका बंदच आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये राहुरी तालुक्यातील ५९ गावांमध्ये करोना बाधित रुग्ण आहेत. तर, राहुरी तालुक्यात आतापर्यंत मिळून ६५८ करोना बाधित आढळले आहेत. करोनाचा वाढणारा हा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात यावा, यासाठी आठ दिवस राहुरी तालुका लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times