चिपळूण : रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगद्यातून सोमवारी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे आता मुंबईकडून गोव्याकडे जाताना कशेडी घाटातून करावा लागणारा अवघड वळणांचा ३० ते ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या १० मिनिटांवर आला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे ३०० वाहने संध्याकाळी सात वाजेपर्यंत या बोगद्यातून सोडण्यात आली. ही वाहतूक सुरू करताना आवश्यक ती सर्व सुरक्षा पाठली गेली.

कशेडी बोगद्यातील दुसऱ्या बोगद्यामधील मार्गिका येत्या २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या घाटातील अवघड वळणांचा प्रवास जानेवारी २०२४पासून करावा लागणार नाही.

सरकारची कंत्राटी नोकर भरती तरुणांचे शोषण करणारी, निर्णय लगेच मागे घ्या अन्यथा… काँग्रेसचा एल्गार
बोगद्याचे काम रिलायन्स व शिंदे कंपनी करत आहे. ४४१ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आतापर्यंत जवळपास ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली. या बोगद्याच्या दोन्ही बाजूला पोलिस तैनात असून बोगद्यामध्ये दिवे, खेळती हवा; तसेच रस्त्यावर कॅट आय, स्पीड ब्रेकर्स, विविध सूचना देणारे फलक, वाहन वेगाची मर्यादा सांगणारा फलक, बोगद्यात रस्त्याच्या बाजूला सुरक्षा बॅग, रुग्णवाहिका व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी : मुंब्रा रेतीबंदर परिसरात जिलेटीनच्या कांड्या, डिटोनेटर सापडलं, कशासाठी होणार होता वापर?
कातळी-भोगावच्या भुयारी मार्गातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. भुयारी मार्गापर्यंत जाणाऱ्या महामार्गावरील तीन पुलांचे काम अपूर्ण असताना त्या ठिकाणांना वळसा घालून पर्यायी एकमार्गी वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्यात येत आहेत. या रस्त्यांना भेगा पडल्यानंतर काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. या बोगद्याला जोडणारा रस्ता जवळपास ९० टक्के काँक्रिटीकरण करून पूर्ण झाला आहे. उर्वरित रख्याच्या कॉक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजे आले पाहिजेत, जरांगे पाटलांच्या पाच मागण्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here