पत्रकार परिषदेत माहिती देताना शिवसैनिक महिंद्र दिपटे म्हणाले की, काल मी मुलीला ट्युशनला सोडायला जात असताना मी चौकात उभा होतो. त्यावेळी आमदार रवी राणाशी संबंधित व्यक्तीनं मला गाडी काढण्यास सांगितले. गाडी रस्त्याच्या कडेला असल्याने मी गाडी काढण्याचे काही कारण नव्हते. तेव्हा आमदार रवी राणा गाडीतून खाली उतरले आणि ते म्हणाले की हाच ना तो संतोष बांगरवर हल्ला करणारा आगाऊ शिवसैनिक महिंद्र दिवटे असं म्हणत रवी राणा माझ्यावर चालून आले. त्यावेळी मी त्यांच्या कानशिलात दोन लावल्या यावेळी त्यांचे उपस्थित असलेले शंभर सव्वाशे कार्यकर्ते आणि राणा यांनी मला खाली ढकलून मारले यामध्ये माझ्या हाताला दुखापत झाली असून बीपी कमी झाला होता, असं महिंद्र दिवटे म्हणाले.
या घटनेची कुठली पूर्वकल्पना मला नव्हती त्यामुळे मी ना कुठला चाकू हल्ला नाही. माध्यमांमध्ये ब्रेकिंग बनवण्यासाठी आमदार रवी राणा सातत्याने वेगवेगळे स्टंट करत असतात. त्यामुळे त्यांनी काल चाकू हल्ला झाल्याचा बनाव केला असल्याची माहिती अंजनगाव येथील शिवसैनिक महिंद्र दिवटे यांनी आज अमरावती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील खराटे, अमरावती संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, अचलपूर तालुकाध्यक्ष बंडू घोम यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे म्हणाले की, चर्चेत राहण्यासाठी आमदार रवी राणा हे सातत्याने स्टंट करत असतात. आज एकटा शिवसैनिक आहे त्यानं राणा यांना आपली जागा दाखवली आहे. एकट्या शिवसैनिकाला मारण्यासाठी आमदार रवी राणा दीडशे दोनशे कार्यकर्ते घेऊन येणे ही त्यांच्यासाठी शरमेची गोष्ट आहे. यापूर्वी चर्चेत राहण्यासाठी आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी कशाप्रकारे अनेक स्टंट केले आहेत. एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात बसमध्ये माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी विनयभंग केल्याचा कांगावा त्यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी सगळ्या मीडियाचे लक्ष स्वतःकडे केंद्रीत केले होते मात्र जेव्हा त्या खाजगी वाहिनीने अन कट तो सीन दाखवला तेव्हा खासदार नवनीत राना यांचा बनाव उघड झाला होता, असं खराटे म्हणाले.यासंदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांना राणा व त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यावर रवी राणा यांची काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.