सिंधुदुर्ग: कणकवली-मालवण राज्यमार्गावर बेळणे येथे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात भरड रिक्षा स्टॅन्ड मालवण येथील रिक्षाचालक जयराम उर्फ बाबजी दिगंबर मसुरकर (५५, रा. खैदा ,कोळंब) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माकडाने रिक्षावर अचानक उडी मारल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
चिपी विमानतळाची परिस्थिती नाजुक; गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड, पालकमंत्र्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक जयराम मसुरकर हे दुपारी आपल्या रिक्षेतून प्रवासी घेऊन महान या गावी येथे जात होते. मसुरकर यांची रिक्षा खैदा येथे आली असता एका वानराने अचानक रिक्षावर उडी मारली. त्यामुळे ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक जयराम मसुरकर यांच्या डोक्याला तोंडाला गंभीर दुखापत होऊन अति रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली. मसुरकर यांच्या अंगावर रिक्षा पडली असावी अशीही शक्यता वर्तवली जात होती.

डेरीला दूध देऊन फायदा मिळेना, स्वतःचा व्यवसाय थाटला अन् कमावतायत भरघोस उत्पन्न

अपघाताची घटना समजताच स्थानिकांनी फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिकेतून जयराम मसुरकर यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु जयराम मसुरकर यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने तपासणी अंती स्पष्ट केले. रिक्षाचालक जयराम मसुरकर यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच मालवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भरड परिसर आणि शहरातील रिक्षाचालक तसेच मित्रपरिवार मालवण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले. मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण यासाठी येत्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे आणि पथकाने ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन अपघाताची माहिती घेतली. जयराम मसुरकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here