नागपूर: शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात असुनही पीओपी मूर्ती विक्रेते उघडपणे धुडकावत आहेत. मंगळवारी नागपूर महानगरपालिका आणि एनडीएसच्या पथकाने शहरातील चितारओळी आणि भावसार चौकात पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई केली. या कालावधीत मनपा अधिकारी यांनी १०३ पीओपी मूर्ती जप्त करून विक्रेत्यांकडून १ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
आता पुण्याचा गणेश उत्सव जर्मनीत साजरा होणार; तुळशीबागेचा गणपती बाप्पा सातासमुद्रापार पोहोचणार
मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी नागपूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग एनडीएसने आणि पोलीस यांनी पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई केली. यावेळी शहरातील चितारओळी आणि भावसार चौकातील पीओपी मूर्ती विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. मनपाचे एनडीएस पथक यांनी बाजारातील प्रत्येक दुकानाला भेट देऊन गणेशमूर्तींची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर पीओपी मूर्ती आढळून आल्यावर दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील एकूण १३ दुकानांवर छापे टाकून ९८ पीओपी मूर्ती जप्त केल्या आहेत. या कालावधीत मनपा अधिकारी यांनी प्रत्येक दुकानातून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला असून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नागपुरात गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या आवाहनाचा जमिनीच्या पातळीवर फारसा परिणाम होताना दिसत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विक्रीला आळा घालण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी जारी केले आहेत. तरीही शहरातील बाजारपेठांमध्ये पीओपी मूर्तींची खुलेआम विक्री सुरू आहे.

पाच रुपयात मिळणार गणपती बाप्पाची मूर्ती, पुण्यात आगळा वेगळा उपक्रम

सोमवारीच महापालिकेने बाजारिया चौकातील शाहू मूर्ती भंडारवर कारवाई करत ३५० पीओपीच्या गणेशमूर्ती जप्त केल्या होत्या. एवढेच नाही तर घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता पीओपी विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एनडीएस आणि झोन स्तरावर शहरातील प्रत्येक बाजारपेठेत सखोल तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here