जळगाव: इंडियाच्या माध्यमातून रावेर लोकसभेची जागा आली आणि पक्षाने मला जर आदेश दिला, तर मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सध्या रावेर मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या सून भाजप पक्षाच्या रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत.
काका पुतण्याचे वार-प्रतिवार; चाकणकरांची वादात उडी, रोहित पवारांना त्यांचा इतिहास सांगत झापलं!
गेल्या काही दिवसांपूर्वी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची स्वाभिमानी सभा पार पडली होती. या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाषणात लोकसभेचा धनुष्य एकनाथ खडसेंनी उचलावा, असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी पक्षाचा जर आदेश आला तर मी लोकसभा लढवणार असल्याचे बोलून दाखवले. लोकसभेच्या रावेर मतदार संघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रावेर लोकसभा क्षेत्र अनेक वर्षापासून काँग्रेस हे लढत आहे. १९९० पासून तर आतापर्यंत काँग्रेस रावेर लोकसभा जागा लढवत आहे. जवळपास दहा निवडणुका झाल्यात काँग्रेस ही जागा लढवत आहे. एक निवडणूक तेरा महिन्यांची सोडली तर या ठिकाणी काँग्रेसला यश आले नाही, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. ९ वेळा ही जागा काँग्रेस हरली असेल. तर इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपल्याकडे ही जागा घ्यावी आणि आपला उमेदवार या ठिकाणी द्यावा शेवटी इंडिया आघाडीच्या माध्यमातून जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल, असे सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

वफाई साबित करायला महाराष्ट्र पडलाय, तुमची लायकी नाही; जितेंद्र आव्हाडांचा मुंडेंवर हल्लाबोल

रावेर लोकसभा मतदार भाजपच्या रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपासून रावेर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. विद्यमान खासदार रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. असे असताना आता एकनाथ खडसे यांनी स्वतः च याच मतदार संघात लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्याने आगामी काळात भाजपकडून रक्षा खडसे यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यास सासरे एकनाथ खडसे यांच्या विरोधात त्यांच्या सून रक्षा खडसे असा सामना रंगणार असल्याची शक्यता आहे.

भाजपचा बालेकिल्ला आणि सध्या विद्यमान खासदार सुद्धा भाजपच्या आहेत. एकनाथ खडसे यांचा मतदार संघात मोठा प्रभाव आहे. ते भाजपमध्ये असताना त्यांच्या या प्रभावामुळे रक्षा खडसे या खासदार झाल्या असे सांगितले जाते. आता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचा या मतदार संघात असलेला प्रभाव लक्षात घेता शरद पवार यांनी भाजपचा पराभव करून हा लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शरद पवार हे एकनाथ खडसे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची राजकीय खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here