वाचा-
वाचा-
दीपक कोच्चर हे व्हिडीओकॉनची उपकंपनी असलेल्या नू पॉवर या कंपनीचचे संचालक होते. मुळात नू पॉवर ही कंपनी केवळ कागदोपत्री होती. आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोच्चर यांनी पदाचा गैरवापर करीत बँकेद्वारे नू पॉवर कंपनीला तब्बल १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले, असा आरोप आहे. ते कर्ज पुढे बुडित खात्यात गेले. पण कर्ज बुडित खात्यात जाण्याचे नेमके कारण व त्या कर्जातील पैशांचा नेमका उपयोग कसा झाला, हे दीपक कोच्चर त्यावेळी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) सांगू शकले नव्हते.
वाचा-
या प्रकरणी ईडीने २०१७ ते २०१८ डिसेंबरदरम्यान चौकशी केली होती. यामुळेच चंदा कोच्चर यांनाही बँकेच्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. आता सुमारे दोन वर्षांनंतर या प्रकरणाची फाईल ईडीने पुन्हा उघडल्याचे दिसून येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times