मुंबई: शिवसेनेचे खासदार यांनी अभिनेत्री हिच्याबद्दल वापरलेल्या ” शब्दावरून सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांनी यावर खुलासा केल्यानंतरही विरोधकांनी विशेषत: भाजपनं त्यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. या टीकाकारांना उत्तर म्हणून आता राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवरून अभिनेता अजय देवगणचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

वाचा:

मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारी कंगना राणावत शिवसेनेच्या टीकेच्या रडारवर आहे. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही आव्हानाची भाषा करणाऱ्या कंगनाला संजय राऊत हे ‘हरामखोर’ म्हणाले होते. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर राऊत यांनी खुलासा केला. मला ‘बेईमान’ व ‘नॉटी गर्ल’ असं म्हणायचं होतं, असं ते म्हणाले. राऊत यांच्या या खुलाशावरून भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. हरामखोर म्हणजे ‘नॉटी गर्ल’ असं असेल तर संजय राऊत म्हणजे ‘नॉटी बॉय’ आणि सोनिया गांधी म्हणजे ‘नवमातोश्री’ असं म्हणायचं का, असा सवाल भाजपनं केला होता. तसंच, आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना साक्षरता दिनाच्या खोचक शब्दांत शुभेच्छाही दिल्या होत्या.

वाचा:

राऊत यांनी फेसबुकवर अजय देवगणचा एक व्हिडिओ शेअर करून टीकाकारांना उत्तर दिलं आहे. या व्हिडिओमध्ये ‘रास्कल’ या आपल्या एका चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल बोलताना दिसतोय. इंग्रजीत सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘रास्कल’ या शब्दाबद्दल स्पष्टीकरण देताना दिसतोय. ‘काही लोकांना वाटतं ‘रास्कल’ हा वाईट शब्द आहे. मात्र, शाळेत आम्ही खोड्या केल्या की शिक्षकही आम्हाला ‘रास्कल’ म्हणायचे. ‘नॉटी’ मुलांना वगैरे म्हटलं जातं,’ असं अजय देवगण या व्हिडिओ सांगताना दिसतोय. ‘हरामखोर’ हा शब्दही मला त्याच अर्थानं वापरायचा होता, असं राऊत यांनी या माध्यमातून पुन्हा एकदा सुचवलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here