तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या शेअर्समध्येही गुंतवणूकदारांची चांगली खरेदी दिसून येत असली तरी कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण एकदा आपल्या आर्थिक सल्लागाराशी बोलणे आवश्यक आहे. तुमच्या एका चुकीच्या निर्णयाने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न
गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारा पहिला स्टॉक म्हणजे माझगाव डॉक शिपबिल्डर्स, जो एक मल्टीबॅगर शेअर आहे. एक वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर्स ४२८ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते तर आज शेअरच्या किंमतीने २,०९७.९५ रुपयांवर उडी घेतली आहे. याशिवाय रेल्वे विकास निगम म्हणजेच RVNL च्या शेअर्सनेही गुंतवणूकदारांच्या पैशात अनेक पटींनी वाढ केली आहे. १२ सप्टेंबर २०२२ रोजी RVNL शेअरचा भाव ३४ रुपये होता जो आता १६२.७५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. अशा स्थितीत गेल्या वर्षभरात शेअर्समध्ये ३७८% हून अधिक वाढ झाली आहे.
दुसरीकडे, गुंतवणूकदारांना मालामाल करण्यात जिंदाल स्टीलचे शेअर्सही मागे नाही. जिंदाल स्टीलच्या शेअर्समध्ये २७१ टक्केहून अधिक वाढ झाली असून गुंतवणूकदारही श्रीमंत झाले आहेत. सध्या कंपनीचा शेअर ४९२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत असून एक वर्षापूर्वी हा शेअर १३२.५० रुपयांवर व्यवहार करत होता. तसेच FACT (फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड) देखील गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या समभागांच्या यादीत समावेश आहे.
या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत कंपनीचा स्टॉक १२३ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता, जो आता ५१८.६५ रुपयांच्या पातळीवर गेला असून या कालावधीत स्टॉक ३०९ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
(Disclaimer: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या)