म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मरीन ड्राइव्हच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येकी एका मार्गिकांचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून त्या वाहनचालकांसाठी खुल्या केल्या जाणार होत्या. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार होता. मात्र मार्गिका सुरू केल्यास याच टप्प्यातील दुसऱ्या मार्गिकांच्या कामांत येणारे अडथळे, सुरक्षिततेचे निर्माण होणारे प्रश्न या कारणांमुळे सुरुवातीच्या दोन टप्प्यांतील प्रत्येकी एक मार्गिका त्वरीत खुल्या न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

किनारा रस्ता प्रकल्पाचे काम २०१८मध्ये सुरू झाले होते. या प्रकल्पाचे तिन्ही टप्पे मे किवा जून २०२४पर्यंत पूर्ण करून मार्गिका खुल्या केल्या जाणार आहेत. किनारा रस्ता प्रकल्प हा प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला हा दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक अशा तीन टप्प्यांत सागरी किनारा मार्गाचे काम होत आहे. सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

कोस्टल रोडच्या किंमतीत भरमसाठ वाढ, ‘सल्ला’ महागात पडला; ३५ कोटींचे कंत्राट ८५ कोटींवर

सागरी किनारा मार्गाच्या मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क या पहिल्या टप्प्यात मरीन ड्राइव्हकडे जाणारी एक मार्गिका आणि प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला या दुसऱ्या टप्प्यातील प्रियदर्शनी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या एका मार्गिकांचे काम नोव्हेंबर २०२३पर्यंत पूर्ण करून त्या त्वरीत वाहनचालकांसाठी खुला करण्याचा मुंबई महापालिकेने निर्णय घेतला होता. हा निर्णय आता मागे पडला आहे. या मार्गिका वाहनचालकांसाठी त्वरीत खुली न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती किनारा रस्ता प्रकल्पातील सूत्रांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील प्रियदर्शनीकडे जाणारी आणि दुसऱ्या टप्प्यातील लोग्रो नालाच्या दिशेने जाणारी दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू असणार आहे. त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातीलही दोन्ही मार्गांचेही काम सुरू असेल.

Mumbai Costal Road: कोस्टल रोडचं काम रखडलंं, खर्चात तब्बल २२६ कोटी रुपयांची वाढ, वाढीव खर्चाचा भार मुंबईकरांवर

वाहनांची वर्दळ वाढेल

या कामांमुळे सुरुवातीच्या दोन टप्प्यांतील एक-एक मार्गिका सुरू केल्यास अन्य मार्गिकांच्या कामात अडथळा येऊ शकतो. अन्य मार्गिकांच्या कामांसाठी साहित्यांची ने-आण करण्यासाठी ट्रक, टेम्पो, क्रेन यासारख्या वाहनांची सतत ये-जा सुरू राहणार आहे. त्याचा परिणाम वाहतुकीसाठी खुल्या होणाऱ्या मार्गिकांवर होऊ शकतो. वाहनांची वर्दळ सुरू राहिल्यास साहित्य नेणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय सुरक्षिततेचे प्रश्नही निर्माण होणार असून त्यामुळे अपघाताची शक्यताही आहे. परिणामी, सुरुवातीच्या दोन टप्प्यांतील एकही मार्गिका वाहनांसाठी त्वरित खुली न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाऊण तासांचा प्रवास १५ मिनिटांत

पहिला टप्प्यात प्रियदर्शनी ते मरीन ड्राइव्हपर्यंत साडेतीन किलोमीटर लांबीचा बोगदाही सेवेत येणार आहे. त्यामुळे एकंदरीतच वरळी सी-फेस ते मरीन ड्राइव्ह असा सध्या अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास दहा ते पंधरा मिनिटांत होणार आहे. या बोगद्यातून साधारण तीन चे चार मिनिटांत प्रवास होईल. मात्र अन्य मार्गिकांच्या कामांमुळे तूर्तास एकही मार्गिका खुली न करण्यावरच शिक्कामोर्तब केले आहे.

अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here