बंगळुरू: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या बिदर जिल्ह्यात एक भलतीच घटना घडली आहे. पोलिसांनी ७८ वर्षांच्या वृद्धाला अटक केली आहे. त्यांच्यावर चोरीचा आरोप आहे. विशेष म्हणजे ही चोरी त्यांनी ६० वर्षांपूर्वी केल्याचा पोलिसांचा दावा आहे. सहा दशकांपूर्वी वृद्धानं दोन म्हैशी आणि एक रेडकू चोरलं होतं. लातूरच्या उद्गगीर जिल्ह्यात राहणाऱ्या गणपती विठ्ठल वाघमोरे यांच्यावर १९६५ मध्ये चोरीचा आरोप झाला होता. कर्नाटकच्या बिदरमधील मेहकर गावातून दोन म्हैशी आणि एक रेडकू चोरीला गेलं होतं. त्या प्रकरणात वाघमोरे मुख्य आरोपी होते.१९६५ मध्ये काय घडलं होतं?लातूरच्या तकलगावमध्ये राहणाऱ्या गणपती वाघमोरे यांनी २५ एप्रिल १९६५ मध्ये चोरी केली होती. ही चोरी बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यामधील मेहकर गावात झाली होती. वाघमोरेंनी मुरलीधर माणिकराव कुलकर्णींच्या दोन म्हैशी आणि एक रेडकू चोरलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. जिल्ह्यातील कुर्की गावात म्हैशी आणि रेडकू सापडलं. त्यांना कुलकर्णींच्या ताब्यात देण्यात आलं. वाघमोरेंना अटक करण्यात आली. मात्र न्यायालयानं त्यांना जामीन दिला. त्यानंतर ते फरार झाले. त्यांच्याविरोधात न्यायालयानं वॉरंट जारी केलं होतं. पोलीस त्यांना वर्षभरापासून शोधत होते.काही वर्षांपूर्वी माणिकराव कुलकर्णी यांचं निधन झालं. आता वाघमोरेंचं वय पाहता त्यांना जामीन मिळण्याची शक्यता असल्याचं पोलीस म्हणाले. मात्र यावेळी पोलीस त्यांच्यावर करडी नजर ठेवणार आहेत. वाघमोरेंनी १९६५ साली केलेल्या चोरीत कृष्ण चंदर नावाच्या व्यक्तीचाही सहभाग होता. त्यावेळी चंदर ३० वर्षांचा होता. २००६ मध्ये त्याचा मृत्यू झाला.आता ७८ वर्षांचे असलेल्या वाघमोरेंना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. एलपीसी योजनेच्या अंतर्गत ही कारवाई केली जाते. प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असलेल्या प्रकरणात या योजनेच्या अंतर्गत कारवाई होते. वाघमोरेंना झालेली अटक झालेली अटक अतिशय जुन्या प्रकरणातील आहे. कर्नाटकात येणारा बिदर जिल्हा महाराष्ट्राला लागून आहे. या भागात आंतरराज्यीय गुन्हे सातत्यानं घडत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here