२०१७ मधील उपशिक्षणाधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित केला आहे. लांडगे हे सध्या बीड जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागात विज्ञान पर्यवेक्षक तथा सहायक योजना अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील ते रहिवासी आहेत. दत्तात्रय लांडगे यांचे शालेय, महाविद्यालयीन व बी.एडचे शिक्षण धारशिव जिल्ह्यात झाले असून पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले झाले आहे. यापूर्वी ते नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते. सध्या ते बीड येथील माध्यमिक शिक्षण विभागात विज्ञान पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहेत.
उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाल्या नंतर दत्तात्रय लांडगे यांचे जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक, यांच्यासोबत शिक्षण विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. दत्तात्रय लांडगे संघर्षमय प्रवास करत इथपर्यंत पोहोचले असल्याचे जिल्हा परिषद सिओ पाठक यांनी बोलताना सांगितले.