पूर्वा वळसे पाटील या दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या. तशा त्या राजकारणात पडद्यामगच्या कलाकार होत्या. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वडिलांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे त्यांनी ठरवले आहे. त्यांनी मतदार संघात महिला संघटन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. तसे त्यांनी त्यांच्या दौऱ्यातून सुरू देखील केले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत त्यांनी महाराष्ट्राचे दौरे देखील केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा चेहरा तसा राजकारणात नवीन नाही. मात्र वडिलांच्या सोबत उभे राहणे त्यांच्या सोबत मतदार संघात संघटन निर्माण करणे ही महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडण्यास सुरुवात केली. दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय वारसा त्यांनी पुढे चालवावा अशी अनेकांची इच्छा देखील आहे.
पवार आणि वळसे कुटुंबांचे घरातले संबंध. मात्र एका फुटीने त्या घरात देखील दुरावा निर्माण झाल्याचे आपण पाहिलेही. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अंत्यत निकटवर्तीय असल्याचे सर्वानाच माहीत होते. मात्र, एका घटनेने सर्व चित्र बदलले. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात आता पवार विरुद्ध वळसे पाटील असा संघर्ष पहायला मिळतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे एका युवा तरुण नेतृत्व म्हणून पूर्वा वळसे पाटील यांच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे. पूर्वा वळसे पाटील यांनी मतदार संघात येऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेणे, नागरीकांच्या समस्या सोडवणे, अशा अनेक गोष्टी त्यांनी करणे आता गरजेचे असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. कारण येणाऱ्या काळात वळसे पाटील यांना राजकीय विरोधक वाढणार यात काही शंका नाही. त्यासाठीची आखणी आता पूर्वा वळसे पाटील यांनी सुरू करणे गरजेचे आहे.