लखनऊ: अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी खोदकामादरम्यान प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्सवर फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी या खोदकामात सापडलेल्या प्राचीन अवशेषांचा फोटो शेअर केला आहे. या खोदकामादरम्यान सापडलेले सर्व अवशेष एकाच ठिकाणी ठेवलेले दिसत आहेत. यामध्ये अनेक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश आहे. याबद्दलची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

चंपत राय यांनी एक्सवर शेअर केलेल्या फोटोसोबत लिहिले की, श्री रामजन्मभूमी येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मंदिराचे अवशेष. यामध्ये अनेक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश आहे.
या उत्खननादरम्यान सापडलेले अवशेष रामललाच्या भव्य मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. उत्खननादरम्यान सापडलेल्या वस्तूंची छायाचित्रे पहिल्यांदाच समोर आली आहेत हे विशेष. यामध्ये हिंदू देवी-देवतांच्या अनेक मूर्ती असल्याचं चित्रात दिसत आहे. मंदिरांमध्ये बसवलेले खांबही यामध्ये दिसत आहेत. आता रामललाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही त्यांचे दर्शन घेता येणार आहे.

जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर…
रामभक्तांना याचे दर्शन घेता यावे म्हणून हे अवशेष गॅलरीत ठेवण्यात आले आहेत जिथे त्यांना याबाबत माहिती दिली जाते. या अवशेषांवर नक्षीकाम केलेलं दिसत आहे. तसेच, देवांच्या मूर्तीवरही नक्षीकाम दिसत आहे.

नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा; अयोध्येच्या राम मंदिरात झळकणार नगरच्या कलाकाराची 3D शिल्प

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट राम मंदिर परिसरात एक संग्रहालय तयार करेल. या संग्रहालयात या अवशेषांना ठेवलं जाईल. या संग्रहालयात भक्तांना अगदी सहजतेने हे अवशेष पाहायला मिळतील. यामध्ये १९९२ मध्ये सापडलेले अवशेषांचा देखील समावेश आहे. नक्षीकाम असलेले स्तंभ, दगडांसह प्राचीन शिवलिंगही येथे ठेवले जाईल. याला प्राचीन खजिन्याप्रामाणे संरक्षित करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here