बहुतेक घर खरेदीदारांना त्यांच्यासाठी योग्य खरेदी काय आहे याची काळजी असते. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत तुम्ही स्वतःसाठी घर कसे निवडावे याबाबत आपण सविस्तर समजून घेऊया.
जुने घर खरेदीला पसंती
कोविड-१९ नंतर रिअल इस्टेटच्या किंमतीत झालेली वाढ पाहिल्यानंतर अनेक जुने फ्लॅट खरेदीकडे पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वळत आलेत. बांधकाम व्यावसायिक अनेक नवीन प्रकल्प, खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स घेऊन येत आहेत, पण कोणती गुंतवणूक सर्वोत्तम आहे याबद्दल खरेदी करणाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. तुम्ही नवीन घर घ्यावे किंवा जुने घर, दोघांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तुम्ही कोणते आणि कोणत्या प्रकारचे घर घ्यायचे हे ठरवणे पॅटर्न, बजेट आणि लोकेशन यावर अवलंबून असते.
नवीन घराचे फायदे काय
गुंतवणूक नाही तर राहण्यासाठी घर शोधात असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल कारण प्रॉपर्टी पुन्हा-पुन्हा खरेदी केली जात नाही विशेषतः वाढलेल्या महागाईच्या काळात आणि हा एक महागडा व महत्त्वाची डील असून हा निर्णय घेणे सोपे नाही. बहुतेक रिअलटर्स त्यांच्या घरात गुंतवणूक करू पाहणाऱ्या खरेदीदारांना विविध ऑफर देतात. नवीन घरांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतात आणि सर्वकाही नवीन असते आणि देखभाल खर्च खूप कमी असतो, त्यामुळे बिल्डरकडून नवीन फ्लॅट घेणे चांगला निर्णय ठरेल.
नवीन घर खरेदीचे तोटे
दरम्यान, नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा मोठा तोटे म्हणजे जुन्या फ्लॅटपेक्षा त्याची किंमत जास्त असते. तुम्ही खरेदी करत असलेली नवीन मालमत्ता विकसनशील क्षेत्रात आहे आणि ती पूर्ण विकसित होण्यासाठी किमान ४-५ वर्षे लागतील. दुसरीकडे, जुना फ्लॅट खरेदी करणे म्हणजे त्याची किंमत नवीन पेक्षा कमी असेल परंतु त्यातही वेगळ्या समस्या असतात.
पुनर्विक्री घर खरेदी
जुने किंवा पुनर्विक्री फ्लॅट/घर खरेदी करणे म्हणजे देखभाल (मेंटेनन्स) आणि दुरुस्तीचा खर्च जास्त असेल. तसेच जुन्या फ्लॅटची अनेकवेळा विक्री झाली असल्यास कागदपत्रांमध्ये घोळ निर्माण होण्याची समस्या असू शकते. महत्त्वाचे म्हजे जर तुम्ही भाड्याने होणाऱ्या उत्पन्नासाठी घर घेत असाल तर जुना फ्लॅट खरेदी करण्यात फायदा असून जुने घर खरेदी करण्यापूर्वी फ्लॅटच्या बांधकामाचा दर्जा आणि कागदपत्रे नीट तपासा. तुम्ही कुठेही फ्लॅट खरेदी करत आहात, त्याचे स्थानिक क्षेत्र आणि ट्रान्सपोर्ट मोडची माहिती करून घ्या.