मुंबई : सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचं काही दिवसांत एकामागे एक निधन झालं. पुन्हा बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी आली आहे. गो गोवा गॉन, एक व्हिलन असे सिनेमे देणारे निर्माते मुकेश उदेशी यांचं निधन झालं आहे. ११ सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालं.

दिवंगत निर्मात्याच्या प्रकृतीबद्दल बोलताना ज्येष्ठ निर्माते आणि त्यांचे मित्र प्रवेश सिप्पी म्हणाले, मुकेश उदेशी यांच्यावर चेन्नईमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण होणार होतं. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तयारी सुरू होती. त्यांच्यासोबत अल्लू अरविंद देखील त्यांची काळजी घेण्यासाठी होते. मात्र, दुर्दैवाने किडनी ट्रान्सप्लान्ट ऑपरेशनच्या काही दिवस आधीच त्यांचं निधन झालं. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शोले मधली प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
उर्मिला मातोंडकर आणि मनोज बाजपेयी यांचा राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘कौन’ सिनेमाची त्यांनी सहनिर्मिती केली होती. मुकेश उदेशी हे मॉरिशसमध्ये चित्रित झालेल्या बहुतेक बॉलीवूड चित्रपटांचे लाईन प्रोड्युसर देखील आहेत.

पतीची शेवटची इच्छा ऐकून सीमा देव झालेल्या भावुक, रमेश देव यांच्या निधनानंतर दीड वर्षात घेतला जगाचा निरोप

‘एक व्हिलन’, ‘हिम्मतवाला’, ‘चश्मे बद्दूर’, ‘गो गोवा गॉन’ आणि इतर काही चित्रपट त्यांनी केले होते. त्यांना इंडस्ट्रीत कामाचा तब्बल ३७ वर्षांचा अनुभव होता. मुकेश उदेशी यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा परसली असून अनेकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here