आरती गंधे, यवतमाळ: दुष्काळातही प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची घोषणा चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने केली. अजूनही यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक शेतकरी या प्रोत्साहन योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती आहे. अवघ्या एक दिवसावर पोळा असतानाही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांत संताप आहे.

सततची नापिकी आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी बँकांची कर्जफेड करू शकत नाही. या परिस्थितीत आधार देण्यासाठी सरकार काही अटींसह शेतकऱ्यांना कर्जमाफी देते. काही शेतकरी आर्थिक अडचण असली तरी प्रामाणिकपणे नियमित कर्जाची परतफेड दरवर्षी करीत असतात. त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. प्रामाणिकपणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा म्हणून राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने २०१९मध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. यातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा लाभ देण्यात येणार होता. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी शिवसेनेत फूट पडून सरकार कोसळले. पुढे शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुती सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना कायम ठेवली. यवतमाळ जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांनी लाभाची रक्कम बँकेच्या खात्यात जमा झाली काय पाहण्यासाठी अनेकदा बँकेत गेले. पण, पदरी निराशाच पडली.

मोदी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये कसे देतात? नानांनी आकडेमोड, गणित सांगितल्यावर लोकांच्या टाळ्या!

* महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना.

* २०१९मध्ये जाहीर या योजनेंतर्गत ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान.

* आधार प्रमाणिकरण झालेली खाती : ७१,९७४

* योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या : ६६,८०६

* शेतकऱ्यांना मिळालेला लाभ : २५३ कोटी ७२ लाख १९ हजार

* लाभापासून वंचित शेतकरी : ५,१६८

गणेशोत्सवाआधी आंबा, काजूची नुकसान भरपाई द्या; कोकणातील शेतकरी आक्रमक

पोळ्याच्या खर्चाची चिंता

चार वर्षांपासून विदर्भातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. यंदा अतिवृष्टीमुळे अधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची मदत पोळ्यापूर्वी मिळणार, ही आशा शेतकऱ्यांना होती. पण, मदत मिळाण्याची तूर्तास कुठलीही चिन्हे नाहीत. उलट अडचण सहन करून, घरातील सोने विकून बँकेचे कर्ज मुदतीच्या आत फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा सरकारला विसर पडला आहे. बाजारात बैलाच्या सजावटीचे साहित्य महागले आहे. खिशात दमडीही उरलेली नसल्याने सण कसा साजरा करायचा ही चर्चा शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे.

शेतकरी तरुणानं प्रश्न विचारला, भर सभेत चंद्रकांत पाटलांनी खडे बोल सुनावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here