मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याच्या अधीन असली तरी त्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार श्रीमंतांच्या यादीत कधी सामील होतील, हे सांगता येत नाही. अशा अनेक कंपन्यांचे शेअर बाजारात आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांचे नशीब पालटून त्यांना श्रीमंत केले आहेत. असाच एक स्टॉक म्हणजे डेकोरेटिव्ह लॅमिनेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्टाइलम इंडस्ट्रीजचा, ज्याने अवघ्या १० वर्षांत मल्टीबॅगर परतावा देत गुंतवणूकदारांना कोट्याधीश बनवले आहे.

स्टाइलम इंडस्ट्रीजचा व्यवसाय काय?
स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक भारतीय कंपनी असून लॅमिनेट, घन पृष्ठभाग पॅनेल आणि वन उत्पादनांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये हाय-प्रेशर लॅमिनेट, परफॉर्मन्स लॅमिनेट (HPL), स्पेशालिटी लॅमिनेट, एक्सक्लुझिव्ह सरफेस, ॲक्रेलिक सॉलिड सरफेस आणि कॉम्पॅक्ट लॅमिनेटचा समावेश आहे. मुख्यतः ही कंपनी आपली उत्पादने युरोपियन आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांना पुरवते. या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना १४,७०० टक्केहून अधिक परतावा दिला आहे.

गुंतवणूकदार एका झटक्यात करोडपती, गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा; कमाईची मोठी संधी
१२ रुपयांवरून शेअर १८०० रुपये पार
कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केलेले आज श्रीमंत झाले आहेत. १० वर्षांपूर्वी १० सप्टेंबर २०२३ रोजी स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर फक्त १२.४८ रुपये होता, ज्याने या आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी १,८६९.९५ रुपयांवर उडी घेतली. त्यानुसार या १० वर्षांच्या कालावधीत कंपनीच्या गुंतवणूकदारांना १४,७०० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

हा शेअर खरेदी करणाऱ्यांना कुबेर पावला… 10 वर्षात करोड रुपयात दिला परतावा, पुढे अजून सुसाट पैसा
१० वर्षात शेअरची वाटचाल
शेअरची गेल्या वर्षाच्या वाटचालीवर नजर टाकले तर १० सप्टेंबर २०१३ रोजी बीएसईवर स्टॉकची किंमत १२.४८ रुपये होती त्यानंतर स्टॉकने मागे वळून पाहिले नाही. एक हजाराची पातळी गाठल्यानंतर पुढील एका वर्षात किंमत पुन्हा हळू वाढली आणि ९ सप्टेंबर २०२२ रोजी ११५२.०५ रुपयांवर बंद झाला. पण वर्ष २०२३ ची सुरुवात स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्ससाठी उत्तम ठरली आणि जोरदार उसळी घेत शेअरने १७५० रुपयांची पातळी ओलांडली आहे. स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअरची ५२ आठवड्यांचा उच्चांक १९७०.७० रुपये, तर त्याची नीचांकी ९४१.७० रुपये आहे.

TATA समूहाच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी, गुंतवणुकदारांना मोठा फायदा होणार? कारण काय जाणून घ्या
एक लाखाची गुंतवणूक बनली करोड रुपये
जर एखाद्या गुंतवणूकदाराने १० सप्टेंबर २०१३ रोजी स्टाइलम इंडस्ट्रीज स्टॉक्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आतापर्यंत ठेवले असतील, तर आता त्यांची एक लाखाची गुंतवणूक सुमारे १.५० कोटी रुपयांपर्यंत वाढली असेल. अशाप्रकारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

(Disclaimer: इथे दिलेला तपशील फक्त माहितीसाठी आहे आणि गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमच्या अधीन असते म्हणून एक्स्पर्टच्या सल्ल्याने गुंतवणूक करा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here