मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात काही जण चित्रपटगृहाबाहेर तिकिटाचे पैसे परत मागताना दिसत आहेत. चित्रपट चांगला चालत असताना, समीक्षक कौतुक करत असताना ही मंडळी तिकिटाचे पैसे परत का मागत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागचं कारण जरा विचित्र आहे.सहर राशिद नावाच्या यूजरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक तरुणी चित्रपट केवळ एक तास आणि दहा मिनिटांत संपल्याचं सांगत आहे. एक तास आणि दहा मिनिटांनतर स्क्रीनवर मध्यांतर झळकलं आणि आम्ही सगळेच कोड्यात पडलो. स्क्रिनवर मध्यांतर का दाखवण्यात येत आहे, असा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला. त्यानंतर प्रेक्षकांना थिएटरमध्ये झालेली चूक समजली. चित्रपटगृहात मध्यांतरानंतरचा भाग दाखवण्यात आला. त्याआधीचा भाग दाखवलाच गेला नाही, ही बाब लक्षात येताच सगळे प्रेक्षक व्यवस्थापनाकडे पैसे मागायला गेले, असं तरुणीनं सांगितलं. सहरनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचं लिहिलं आहे. तिनं पोस्ट ९ सप्टेंबरला शेअर केली. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओला हजारो लाईक आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. ‘जवान भारतात तयार झालेल्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासोबत असा प्रकार घडणं दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल व्हायला हवा,’ अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर दुसऱ्यानं दु:ख वाटतंय, पण हे मजेशीर आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओला मिळणारे व्ह्यूज झपाट्यानं वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here