Actress Kriti Verma who quit GST Job for Acting career Ed named in TDS Fraud Money Laundering case with boyfriend Bhushan Patil; जीएसटीमधील नोकरी सोडून अभिनयात पाऊल, भूषण पाटीलसोबत रिलेशनशीप, आता २६४ कोटींच्या घोटाळ्यात ईडीच्या रडारवर
मुंबई : जीएसटी विभागातील नोकरी सोडून मनोरंजन क्षेत्रात उतरलेली अभिनेत्री कृती वर्मा हिच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. २६४ कोटींच्या फसव्या टीडीएस परतावा प्रकरणात माजी जीएसटी निरीक्षक-अभिनेत्री कृती वर्मासह तिचा प्रियकर आणि व्यावसायिक भूषण पाटील, माजी आयकर निरीक्षक तानाजी अधिकारी आणि इतरांवर आरोप आहेत. ईडीने या प्रकरणात डझनभराहून अधिक आरोपींची नावे लिहिली आहेत. फसवणुकीने मिळवलेले पैसे जमा करण्यासाठी वापरल्या जाणार्या कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचा यात समावेश आहे. ईडीने या प्रकरणात १६६ कोटी रुपयांची मालमत्ता आणि मौल्यवान वस्तू जप्त करु गोठवल्या होत्या. गुन्ह्याच्या उर्वरित रकमेचा तपास सुरु आहे.
आयकर कार्यालयात वरिष्ठ कर सहाय्यक पदावर असलेला तानाजी अधिकारी टीडीएस परतावा विभागात कार्यरत होता. त्याने वरिष्ठ अधिकार्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांची लॉगिन क्रेडेन्शियल्स शोधून काढली. सहकाऱ्यां