बुलढाणा : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु होतं. १ सप्टेंबरला सायंकाळी अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यावेळी घडलेल्या घटनेत आंदोलक आणि पोलीस देखील जखमी झाले होते. जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील घटनेनंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहे. बुलढाण्यात आज पुन्हा एक मराठा लाख मराठा घोषणा करत पुन्हा एकदा मराठ्यांचा मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आलं आहे. या मोर्चाला जालन्यातील अंतरवाली सराटीतील आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी जरांगे पाटील बुलढाण्यातील मोर्चात सहभागी झाली आहे.

मला माझ्या वडिलांची काळजी आणि आरक्षणाचीही : पल्लवी जरांगे पाटील

जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सोळा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यानंतरच आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाजाने शांतीपूर्ण मोर्चाचे आयोजन केले होते. जालना येथे झालेल्या समाज बांधवांवर लाठी हल्ल्याचा निषेध आणि समाजाला आरक्षण मिळण्याच्या समर्थनार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

IRCTC च्या वेबसाईटवर आता एसटी बसचेही आरक्षण, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण करार

बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाजाच्या वतीने पाच तरुणींनी आपले निवेदन दिले. या मोर्चा साठी बुलढाण्यात दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या कन्या पल्लवी पाटील हिने माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी तिला आंदोलनाबाबत विचारले असता तिने मला माझ्या वडिलांची आणि आरक्षणाची देखील काळजी असल्याचे बोलले आहे. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत. त्यामुळे सरकारने आम्हाला आरक्षण त्वरित द्यावे असेही तिनं पुन्हा एकदा सरकारला ठणकावलं आहे.
तर तुमचं सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या ना… काकांविरोधात रोहित पवार ठासून मैदानात!
आम्ही मराठा असून पेठून उठलेलो आहोत, आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकारला पण याची दखल घ्यावी लागेल, असं पल्लवी जरांगे म्हणाले. वडील आरक्षण भेटल्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत, असा विश्वास पल्लवी जरांगे हिनं व्यक्त केला. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या, मला माझा बाप हवाय, असंही ती म्हणाली.

शिंदे पिता-पुत्र भाजप कार्यकर्त्यांचं पद्धतशीर खच्चीकरण करताहेत; भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here