कोलकाता : ईडी सीबीआयच्या समन्सला किंवा नोटीसीला घाबरण्याचं कारण नाही. भ्रष्टाचारी नेत्यांनो तुम्हाला भाजपची दारं सदैव उघडी आहेत, असं धक्कादायक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी केलं. तसेच भाजप प्रवेशासाठी उघडपणे बोलायला भीती वाटत असेल तर मला फेसबुकवर संपर्क करू शकता किंवा मला थेट फोनही करू शकता, अशी ऑफरच त्यांनी दिली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. पश्चिम बंगालमधील बिरभूममधील बोलपूर येथे पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढवला. यादरम्यान त्यांची गाडी सुस्साट सुटली होती. भ्रष्टाचारी नेत्यांवर बोलता बोलता त्यांनी थेट पक्षप्रवेशाची ऑफरच दिली. परंतु त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजपची मात्र चांगलीच गोची झालीये.
हातात सोन्याचे वजनदार कडे आणि गळ्यात मोठमोठ्या चेन घालून फिरणाऱ्या भ्रष्टाचारी नेत्यांना सीबीआय आणि ईडीकडून समन्स मिळण्याची भीती वाटत आहे. पण त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनी माझ्या फेसबुक पेजवर जावे आणि मला तिथून संपर्क करावा. ज्या भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत बोलण्यासाठी भीती वाटत असते किंवा तसे उघडपणे बोलायचे नसेल त्यांनी मला थेट फोन करावा. भारताविरुद्ध फायनल मॅच कोण खेळणार? जाणून घ्या कोणाचा पत्ता कट होणार, असे आहे समीकरण तुमचा पक्षासाठी काय फायदा होऊ शकतो, यावर आम्ही विचार करु आणि निर्णय घेऊ, अशी ऑफरच त्यांनी भ्रष्ट नेत्यांना दिली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तसेच सगळीकडून टीका होऊ लागल्याने त्यांनी कोलांटउडी मारली. Maratha Protest: मला वडिलांची अन् आरक्षणाचीही काळजी, मनोज जरांगेची लेक रस्त्यावर, बुलढाण्यातील मोर्चात आक्रमक माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. एखादा नेता भ्रष्टाचारात जर अडकला असेल पण तो आता इमानदार झाला असेल, त्याची प्रतिमा सुधारली असेल तर अशा लोकांसाठी भाजपची दारे उघडी आहेत असं मला म्हणायचं होतं, अशी सारवासारव अनुपम हाजरा यांनी केली.