म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘ऑक्सिजनची टंचाई ही काही ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांमुळे निर्माण झाली असल्याने या कंपन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महसूल, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके नेमण्यात आली आहेत. पुण्यात ऑक्सिजनचा आणखी तुटवडा निर्माण झाल्यास रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू या कंपनीकडून साठा पुण्यात आणण्यात येणार आहे’ असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून वैद्यकीय सुविधेऐवजी औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरविण्यात आल्याने टंचाई निर्माण झाली. त्यामुळे या कंपन्यांवर नजर ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महसूल, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पथके नेमण्यात आली आहत. या पथकांकडून कंपन्यांकडून दररोज होणारे उत्पादन आणि विक्रीवर नजर ठेवली जाणार आहे’

‘रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या जेएसडब्ल्यू या कंपनीकडे ऑक्सिजनचा सुमारे तीन हजार मेट्रिक टन साठा आहे. पुण्यात ऑक्सिजनचा आणखी तुटवडा निर्माण झाल्यास या कंपनीतून टँकरद्वारे साठा आणला जाणार आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले. ‘चाकण येथील एअर लिक्विड या कंपनीकडून वैद्यकीय सुविधांसाठी पाच ऑक्टोबरपासून ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. या कालावधीत कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी या कंपनीच्या गुजरातमधील भरूच येथे असलेल्या प्रकल्पातून ऑक्सिजन आयात केले जाणार आहे’ असेही राव यांनी सांगितले.

‘उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांची ऑक्सिजन वितरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कसा होत आहे, हे पाहण्याची जबाबदारी सुरवसे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार रोखण्याचे काम पाटील यांच्याकडून केले जाणार आहे’ असे राव म्हणाले.

पुण्यात ११ कंपन्या

‘ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या पुणे जिल्ह्यात ११ कंपन्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे ८५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन करण्यात येत असून, त्यापैकी अवघे ३५० मेट्रिक टन ऑक्सिजन हे वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत होते. उर्वरित उत्पादनाचा वापर हा औद्योगिक कारणांसाठी केला जात होता. त्यामुळे पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. आता या कंपन्यांना ८० टक्के ऑक्सिजन हे वैद्यकीय उपचारांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरज भासल्यास हे प्रमाण आणखी वाढविण्यात येणार आहे’ अशी माहिती राव यांनी दिली.

ससूनमध्ये ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा

ससून रुग्णालयातील नव्या इमारतीतील ऑक्सिजनचा पुरवठा कमी जास्त वेगाने होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आता गुरुवारपासून दुसऱ्या इमारतीत रुग्णांना स्थलांतर करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. त्या करिता करोनाग्रस्तांच्या नव्या रुग्णांना आता प्रवेश देता येणार नसल्याचे प्रशासनाने निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात १०० रुग्णांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

ससूनरुग्णालयाच्या जागेतील नव्या इमारतीतएप्रिलपासून करोनाच्या रुग्णांना उपचार सुरू करण्यात आले आहेत.त्याइमारतीत सुमारे पाचशेहून अधिक करोनाच्या रुग्णांवर उपचार होत आहेत. ससून रुग्णालयात गंभीर रुगणांची संख्या वाढत आहे. त्यात ऑक्सिजनआणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठ्याचीमागणी वाढू लागली. मात्र ससून रुग्णालयातील गंभीर रुग्णांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यात काही अडचणी आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here