विनीत जांगळे, ठाणे : मुंबई एंट्री – एक्झिट पॉईंटवर टोल नाक्यांच्या १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या प्रस्तावित दरवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरील पूर्व दृतगती महामार्गाच्या मुलुंड टोलनाक्यावर मनसेच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना बुधवारी दुपारी नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रश्नी मुलुंड येथील टोल नाका प्रशासनाला मनसे पदाधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात ही टोलवाढ रद्द केली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुलुंड टोल नाक्यावर एमएसआरडीसीच्या वतीने टोल वसुली सुरु आहे. हा टोल नाका बंद करण्यासाठी तसेच येत्या १ ऑक्टोबरपासून होणारी प्रस्तावित टोल दरवाढ रद्द करण्यासाठी मनसेच्या वतीने टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. ठाणेकर नागरिकांना टोल वसुलीचा होणारा त्रास सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मनसेने प्रशासनाला आज शांततेत निवेदन दिले आहे. मात्र एक रुपयांनी जरी ही टोलवाढ झाली तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा मनसे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी प्रशासनाला दिला. त्यामुळे येत्या काळात टोलनाक्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.भारताविरुद्ध फायनल मॅच कोण खेळणार? जाणून घ्या कोणाचा पत्ता कट होणार, असे आहे समीकरण

येत्या १५ दिवसात प्रस्तावित दरवाढ रद्द केली नाही तर मनसे तीव्र आंदोलनचा पवित्रा घेईल व त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी जाधव यांच्यासह मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे, मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, स्वप्नील महिंद्रकर, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, मंगेश पिंगळे, संदीप साळुंखे, सुशांत सूर्यराव आदी पदाधिकाऱ्यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले.

ईडी-सीबीआयला घाबरू नका, भ्रष्टाचारी नेत्यांनो आमची दारं तुम्हाला सदैव उघडी, भाजप नेत्याचं वक्तव्य

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विसर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणेकर असल्याने मुख्यमंत्र्यांना ही टोलवाढ रोखणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्री ते करतील ही आमची अपेक्षा आहे. हाच टोल नाका बंद करण्यासाठी २०१५ साली आंदोलन करून ते अधिवेशनाला गेले होते. आता सत्तेत आल्यानंतर त्यांना या बाबींचा विसर पडला आहे, असा हल्लाबोल मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली.
“बोलून मोकळं व्हायचं अन्…” व्हिडिओवरुन विरोधकांची टीकेची झोड, एकनाथ शिंदेंचं उत्तर, आतापर्यंत काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here