बीड : महाराष्ट्राची ऐतिहासिक भूमी अशी अनोखी ओळख आहे. महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाड्यात अनेक ऐतिहासिक वास्तू या आजही इतिहासाची साक्ष देतात. यात गडकिल्ले असतील, त्यासोबत जुने वाडे विहिरी यासोबत काही शिलालेखही महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पाहायला मिळतात. याचबरोबर बीड जिल्ह्यातील रांजणी गावात एक ऐतिहासिक विहीर आहे आणि याच विहिरीजवळ एक पीर आहे. या पिराला एक अनोखी ओळख आहे. वर्षातून दोन वेळेस या ठिकाणी यात्रा भरते.

जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर देशातूनही या पिराचं दर्शन घेण्यासाठी नागरिक येतात. मात्र, या पिराच्या ठिकाणी असलेली बरो आणि या पिराचं ठिकाण हे मोडकळीस आलेलं होतं. अनेक वेळा या ठिकाणी सरकार दरबारी निवेदन देऊनही या पिराच्या ठिकाणी आणि ही ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी कोणताही निधी उपलब्ध झाला नाही. निधीच्या मागे लागणे सोडून आता गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की त्या निर्णयाचं कौतुकच केलं जात आहे. या सगळ्या गावकऱ्यांनी एकच शक्कल लढवत चक्क एक हजार रुपयाचं लकी ड्रॉचं तिकीट विक्री करायला सुरू केले.

पाकिस्तानच्या फायनलचा फैसला ५० नाही तर २० षटकांतच होणार, जाणून घ्या सुपर समीकरण
बघता बघता जवळपास हे लकी ड्रॉचे तीन हजाराहून अधिक तिकीट हे विक्रीला गेले असून यातून ३१ लाखाची रक्कम जमा झालेली होती. मिळालेल्या पैशांमधून जवळपास दहा ते बारा लाखाचे बक्षीस वाटण्यात आले. त्यातील बाकीची रक्कम या ऐतिहासिक वास्तूला आणि ऐतिहासिक विहिरीला पुनर्जीवित करण्यासाठी या गावकऱ्यांनी लावली आहे.

कुठूनच निधी मिळत नसल्याने आणि सरकारी दरबारात अनेक वेळा फेटा घातल्यानंतर गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय यात हिंदू मुस्लिम इतरही समाजातील लोकांनी सहभाग नोंदवला. या लकी ड्रॉच्या माध्यमातून या ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळाला जपण्याचं काम करायचं, असं गावकऱ्यांनी असं ठरवलं होतं. आता हे काम मोठ्या उत्साहात गावातील लोक करतात. कारण या गावामध्ये जवळपास मिस्तरी काम करणारे नागरिक राहतात आणि त्यांच्या सहभागातून हे काम आता पूर्ण होत आहे. यासाठी गावकरी मोठ्या उत्साहाने या कामात हातभार देखील लावतात.

मात्र, बीड पासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर असलेलं हे रांजणी गाव आता गावातील सामाजिक सलोखा जपत आज महाराष्ट्रा समोर एक आदर्श ठरत आहे. शासन निधी मिळाला नाही तर काय झालं, जर गावाने एकत्र यायचं ठरवलं तर भल्या मोठमोठ्याला वास्तू देखील आपण जपू शकतो आणि त्याचं पुनर्निमाणही करून भविष्यातील पिढीसाठी हे जगू शकतो. असं गावकऱ्यांनी आपल्या कामातून आणि कर्तूत्वातून महाराष्ट्र समोर एक आदर्श ठेवलेला पाहायला मिळतोय.
Manoj Jarange: ‘इतकी फेकाफेकी पाहिली नाही.. पण मुख्यमंत्री येतील’, ती बातमी कळताच मनोज जरांगे असं का म्हणाले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here