मुंबई व मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. या वादात भाजपनं कंगनाची बाजू घेत तिला थेट ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळं संतापलेल्या शिवसेनेनं ”च्या अग्रलेखातून भाजपला झोडपून काढलं आहे. ‘राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे ही मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील,’ असं अग्रलेखात म्हटलं आहे. शेलार यांनी या टीकेचा समाचार घेताना शिवसेनेला खालील प्रश्न विचारले आहेत.
१. कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना?
२. याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना?
३. भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना?
४. गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?
५. मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का?
६. रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना राणावतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना?
७. बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना?
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times