मुंबई : मुंबईत प्रवेश करण्यासाठीचा पथकर गेल्या २१ वर्षांत दुपटीहून अधिक झाला आहे. चारचाकीसाठी सन २००२मध्ये २० रुपये असलेला पथकर सध्या ४० रुपये आहे. आता १ ऑक्टोबरपासून तो ४५ रुपये होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी (एमएसआरडीसी) एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हा पथकर वसूल केला जातो.

मुंबई महापालिका क्षेत्राच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी सायन-पनवेल मार्गावर वाशी येथे, ऐरोली-मुलुंड मार्गावर ऐरोली येथे, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथे व ठाणे शहरातून येताना मुलुंड येथे दोन पथकर नाके सन २००२पासून सुरू करण्यात आले. २००२पासून दर तीन वर्षांनी या पथकराच्या दरांत वाढ केली जात आहे. यामध्ये चारचाकी, मिनी बस, ट्रक व अवजड वाहने, अशी श्रेणी निश्चित करण्यात आली आहे.

सागरी वादळानंतर लाटांचं पाणी घुसलं, धरण फुटलं; लिबियात हाहाकार, महापुरात पाच हजार जणांचा मृत्यू
एमएसआरडीसीनुसार, सध्या चारचाकी वाहनांसाठी ४० रुपये, मिनी बससाठी ६५ रुपये, ट्रकसाठी १३० रुपये व अवजड वाहनासाठी १६० रुपये पथकर वसूल होत आहे. दर तीन वर्षांनी वाढ होणाऱ्या या पथकरातील अलीकडील दरवाढ १ ऑक्टोबर २०२०पासून लागू झाली होती. ती सहाव्या वसुलीकाळातील दरवाढ होती. आता सातव्या वसुलीकाळासाठी पुढील तीन वर्षांसाठीचा पथकर १ ऑक्टोबरपासून अनुक्रमे ४५ रुपये, ७५ रुपये, १५० रुपये व १९० रुपये होणार आहे. ही दरवाढ ३० सप्टेंबर २०२६पर्यंत लागू असेल. हा पथकर २०२७पर्यंतच वसूल होणार आहे. त्यानुसार आठवा व अखेरचा वसुली कालावधी १ ऑक्टोबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२७ असा एक वर्षासाठीच असेल. मात्र त्या काळातही महामंडळाने पथकर दरवाढ प्रस्तावित केली आहे.

सध्याचे दर (रुपयांत)

चारचाकी : ४०

मिनी बस : ६५

ट्रक : १३०

अवजड वाहन : १६०

वाढीव दर (रुपयांत)

चारचाकी : ४५

मिनी बस : ७५

ट्रक : १५०

अवजड वाहन : १९०

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘रिंग रोड’साठी प्रशासनाचे मोठं प्लॅनिंग, वाचा सविस्तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here