म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्य सरकार तुमची फसवणूक करणार नाही, असे संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना सांगितले आहे. राज्य सरकारवर विश्वास ठेवा, असे देखील भिडे यांनी जरांगे यांना सांगितले आहे. शिष्यांनी गुरुजींवर आणि मग लोकांनी शिष्यांवर विश्वास ठेवावा, यासाठी संभाजी भिडे त्या ठिकाणी गेले होते. भिडे गुरुजी त्या ठिकाणी राज्य शासनाची वकिली करायला गेले होते. संभाजी भिडे सरकारसाठी सांगकाम्याचे काम करत आहेत,’ अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी मुंबईत केली. तर सर्व सरकारी कंपन्या विकून आपले घर चालवा हे सरकारचे धोरण असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील टीका केली.

शिंदे लबाड नाहीत, फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत, उपोषण थांबवा, संभाजी भिडेंची जरांगेंना विनंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘माझ्यावर ज्यांनी आरोप केले आहेत, ते त्यांनी सिद्ध करून दाखवावेत. या व्हिडीओ प्रकरणी तुमचा बेजाबदारपणा सिद्ध झाला आहे. मराठा समाजाचे आंदोलन पेटले असताना तुम्ही असे बेजाबदारपणाचे कसे बोलू शकता, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर मराठा समाजाला दुखवण्याचे काम त्यांनी केले आहे, त्यांचे प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतले नाहीत. त्याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, अशी भूमिका यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मांडली. सरकरच्या बेजबाबदारपणामुळे राज्यात मराठा आंदोलन पेटले आहे. वेळीच लक्ष घातले असते तर असे झाले नसते. चला बोलून मोकळे होऊ म्हणजे प्रश्न तसेच ठेवायचे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनता याना मोकळी करेल,’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

मनोज जरांगेंच्या आंदोलनात संभाजी भिडेंची एन्ट्री होताच नूरच पालटला; खोतकर-भुमरेंकडून झटक्यात सूत्रं हाती घेतली

सरकारी तिजोरीची लूट

कंत्राट भरतीच्या निर्णयाला विरोध करताना या नऊ कंपन्या सरकारी तिजोरीची लूट करणार असून, हा आकडा ३० हजार कोटींच्या घरात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावरून महाराष्ट्रातील तरुणांना त्यांनी या जीआरच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. या जीआरची राज्यभर होळी करा, तुमच्या आयुष्याशी खेळले जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याचा विरोध नोंदवा, अशी सूचना केली. तर आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटलेले असताना कंत्राटी भरतीच्या माध्यमातून ओबीसी, एससी, आणि एसटी या प्रवर्गातील लोकांचे आरक्षण नाकारण्याचा घाट या सरकारने घातला आहे. ओबीसी आणि मराठा समाजाला समाजाला आरक्षणासंदर्भात भांडणात गुंतवून ठेवायचे आणि हळूच कंत्राटी नोकरभरतीचा शासननिर्णय काढायचा असा धूर्त डाव शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने खेळला आहे, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

आंदोलनाच्या १५ व्या दिवशी जरांगेंची खोतकर-भुमरेंकडून मनधरणी,व्यासपीठावर भिडेंची एन्ट्री,सगळे बघतच राहिले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here