मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसने कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वाढीव वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होणार आहे. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त डब्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे.गाडी क्रमांक १०१०५/६ दिवा सावंतवाडी एक्स्प्रेसला तृतीय श्रेणी वातानुकूलितचे तीन डबे जोडण्यात येणार आहेत. सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसला १५ सप्टेंबर आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला १६ सप्टेंबरपासून प्रवाशांना अतिरिक्त डब्यातून प्रवास करता येणार आहे. यामुळे दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता दोन तृतीय वातानुकूलित, १० द्वितीय श्रेणी, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन अशा संरचनेसह धावणार आहे.अवघड वळणांचा ४० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांवर!रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगद्यातून सोमवारी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे आता मुंबईकडून गोव्याकडे जाताना कशेडी घाटातून करावा लागणारा अवघड वळणांचा ३० ते ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या १० मिनिटांवर आला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे ३०० वाहने संध्याकाळी सात वाजेपर्यंत या बोगद्यातून सोडण्यात आली. ही वाहतूक सुरू करताना आवश्यक ती सर्व सुरक्षा पाठवली गेली.कशेडी बोगद्यातील दुसऱ्या बोगद्यामधील मार्गिका येत्या २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या घाटातील अवघड वळणांचा प्रवास जानेवारी २०२४पासून करावा लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here