म.टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘राजकारणाची रेषा किती ताणायची, कुठे थांबायचे याची राजकीय प्रगल्भता, परिपक्वता नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. उपसभापतिपदाच्या राजशिष्टाचारापेक्षा महिलांच्या प्रश्नांसाठी कायम संघर्ष करत राहण्याचे मिशन त्यांनी चार दशकांच्या सामाजिक व राजकीय जीवनात अथकपणे राबविले. अन्याय झाल्यानंतर धडा शिकविण्यासाठी त्यांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला. काही लोक हे आतल्या गाठीचे असतात. नुसते टोमणे मारतात. तशा त्या नाहीत,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा गौरव केला.

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जन्म ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणासाठी झाल्याचे वारंवार अधोरेखित केले होते. ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनीही बाळासाहेबांचा शब्द हा जीव की प्राण समजून पाळला. आनंद दिघे यांच्या तालमीत मी तयार झालो. आज मुख्यमंत्री असलो, तरी कार्यकर्ता या नात्याने काल, आज आणि उद्या काम करण्यात समाधान वाटते. तशाच स्वरूपात महिलांवर कुठेही अन्याय झाला की, उपसभापती म्हणून नव्हे, तर महिलांच्या हक्कांसाठी लढण्याचा ध्यास घेतलेल्या नीलम गोऱ्हे राज्यात कुठेही धावून जातात. यामुळेच शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच महिला कार्यकर्तीस आपण शिवसेनेचे नेतेपद दिले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तर तुमचं सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या ना… काकांविरोधात रोहित पवार ठासून मैदानात!
‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ या करुणा गोखले यांचे राजहंस प्रकाशनाचे पुस्तक राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत राजभवनातील दरबार हॉलमध्ये बुधवारी सायंकाळी प्रकाशित झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ‘राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे काय भूमिका घेतील, अशी काहींना शंका होती. पण त्या मोकळ्या आणि निर्मळ मनाच्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. गोऱ्हे यांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. त्याचा फायदा आम्हाला, सरकारला आणि महिला धोरण पुढे नेण्यासाठी होईल,’ असे शिंदे यांनी सांगितले.

कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, अवघड वळणांचा ४० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांवर!
‘डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सामाजिक व राजकीय प्रवासावर त्यांनी कादंबरी लिहिली, तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा दस्तावेज होईल. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात महिलांचे प्रश्न हा केंद्रबिंदू राहिला आहे. सामाजिक प्रवास करणाऱ्या नीलमताई यांनी मुंबई हे तीर्थ निवडले कारण ते शिवतीर्थ आहे,’ अशा शब्दांत डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतली.

विजय वडेट्टीवारांच्या मनातले मुख्यमंत्री अजित पवार असावेत, नीलम गोऱ्हेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here