म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : पक्ष सोडून सत्तेत गेलेले नेते संभ्रम तयार करत आहेत. त्यांच्या संभ्रमाला बळी पडू नका, प्रतिगामी विचारांच्या विरोधात लढा, हा शरद पवार यांचा संदेशाचे पालन करा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित मेळावा झाल्यानंतर शरद पवार यांचा संदेश घेऊन त्यांचे नातू व अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी बुधवारी स्वागत लॉनमध्ये संवाद साधला.

सकाळी नागपुरात आमगन झाल्यानंतर वर्धा रोडवर नागपुरी तर्री पोह्याचा घेतलेला आस्वाद चर्चेचा विषय ठरला. ‘घेऊन येतो आहे, साहेबांचा संदेश’अंतर्गत आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख मैदानात उतरले आहेत. गणेशोत्सवानंतर विदर्भात मोठ्या सभेचे नियोजन केले जात आहे. सभेचे स्थान अद्याप ठरलेले नाही, या भागातील नेते याचा निर्णय घेतील. ५ ऑक्टोबरनंतर सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये, राजू तिमांडे, दिलीप पनकुले, प्रवक्ते वेदप्रकाश आर्य, पंकज ठाकरे, शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.

रोहित पवारांनी दादा गटातील सुनावलं

‘बडे नेते पक्ष सोडून गेल्याचे जनतेला भावलेले नाही. आगामी काळात अशा स्वार्थी नेत्यांना मतदार आणि पक्षाचे नेते शरद पवार धडा शिकवतील’, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिला. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ साली आठ-दहा जागा येतील, असे भाष्य करणारे तोंडघशी पडले. छोटे नेते गेल्यानंतर मतदारांना ते आवडले नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ५४ जागा आणि सत्ताही आली. आता तर बडे नेते पक्ष सोडून गेले. इतकी वर्षे आजोबांसोबत राहिलेलो आहे. हा विचारांचा लढा आहे. त्यांच्याच विचारांचे उमेदवार निवडून आणले जातील. स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना निश्चित धडा शिकवला जाईल, असेही रोहित पवार म्हणाले.

‘पळाले रे पळाले… आमदार पळाले’, आंदोलकांची कार्यालयावर धाड, नागपुरात काय घडलं?
सत्ता आणि पदांसाठी काही नेते गेले

‘राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. शरद पवार यांच्याकडेच पक्ष आहे. सत्ता आणि पदांसाठी काही नेते गेले. पक्ष आणि चिन्ह आमच्याचकडे राहील. मात्र, निवडणूक आयोग केंद्राच्या हातीतील खेळणे झाल्याने काही सांगता येत नाही’, असा आरोपही करून रोहित पवार म्हणाले, सर्वसामान्यांमध्ये
भाजपविरोधी वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीतील जादू लोकांच्या लक्षात आली आहे. प्रचार, प्रसार म्हणजे विकास नाही, प्रश्न सुटलेले नाहीत, ही बाब जनतेला लक्षात आली आहे.’

महाविकास आघाडीत संपूर्ण राज्याचा अभ्यास करून जागांचा योग्य तोडगा काढला जाईल. तीन-चार निवडणुकांमध्ये सातत्याने पराभूत झालेल्या जागा मित्रपक्षाचा विचार करावा. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यघटनेच्या बाजूने व भाजपच्या विरोधात उभे झालेल्या अन्य उमेदवारांमुळे किती व कसा फटका बसला याचाही विचार करावा लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.

उपसभापती नीलमताई काय भूमिका घेतील, अशी साऱ्यांना शंका होती पण… मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले
घटनादुरुस्ती गरजेची!

मराठा समाजाला १३ ते १६ टक्के आरक्षण ओबीसी वा अन्य कुठल्याही संवर्गात बसू शकत नाही. तरुण पिढीची दिशाभूल करून चालणार नाही. राज्यात जातनिहाय गणना आणि आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल, अशी भूमिका रोहित पवार यांनी व्यक्त केली.

ज्यांच्यामुळे राजकारणात आलो त्यांच्याविषयी बोलू नये; रुपाली चाकणकरांचा रोहित पवारांना सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here