मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात सध्या पैशांचा पाऊस पडत आहे. दारूच्या किंमतीप्रमाणेच मद्य कंपन्यांच्या शेअर्समध्येही झपाट्याने वाढ होत आहे. शेअर बाजारातही दारू लोकप्रिय होत असून बाजारातील विक्रमी वाढीदरम्यान काही मद्य कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांची गुंतवणूक दुप्पट-तिप्पट केली आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी दारू बाजारपेठ आहे, त्यामुळे येथे दारूची मागणी वाढत असून इथे व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा फायदा होत आहे.

अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा दारू बाजार आहे. अशा परिस्थितीत आज आपण अशा दोन कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलणार आहोत ज्यांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड आणि टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षभरात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. काही मद्य उत्पादक कंपन्या फक्त व्यवसायच नव्हे तर लोकांची गुंतवणूक वाढवण्यातही पुढे राहिल्या आहेत.

यांचं मद्यपिऊन झिंगा, किंवा शेअर खरेदी करुन घाला दंगा, ‘या’ स्टॉक्सनी दिला मजबूत परतावा
टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर किंमत

दारू उत्पादनासोबतच कंपनी त्याची विक्रीही करताना त्यांच्या उत्पादनात व्हिस्की, जिन, वोडका इत्यादींचा समावेश आहे. तर कंपनी मदिरा रम, कुरिअर नेपोलियन ब्रँडी इत्यादी नावाने आपल्या उत्पादनांची विक्री करते. टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या वर्षभरात १००% हून अधिक वाढ झाली असून गेल्या सा महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या दरात ४०% हून अधिक वाढ झाली आहे. मात्र स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात प्रॉफिट बुकिंग होतं दिसत असून या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ५% हून अधिक पडझड नोंदवली गेली.

मद्य कंपन्यांचे शेअर्स सुसाट! घरबसल्या पडेल पैशांचा पाऊस, दलाल स्ट्रीटवर ठरलेत ‘सुपर हीट’
सोम डिस्टिलरीज आणि ब्रुअरीज लिमिटेड शेअर किंमत
ही कंपनी रम, वोडका आणि व्हिस्की सारखी उत्पादने विकते. शुक्रवारी कंपनीच्या शेअरचा भाव २.१०% उसळीसह २४६ रुपयांवर बंद झाला. तर गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत जवळपास ३०० टक्के वाढ झाली असून सहा महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीचे शेअर्स विकत घेतले असतील त्यांची गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाली असेल.

(Disclaimer: इथे दिलेला तपशील माहितीसाठी आहे आणि गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ञाचा सल्ला घ्या. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here