MCX वर सोने-चांदी लाल रंगात
अमेरिकेने कंझ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) महागाईची आकडेवारी जाहीर केल्यानंतर मौल्यवान धातूचे फ्युचर्स गुरुवारी लाल रंगात रंगात रंगलेले दिसून आले. सोन्याचे फ्युचर्स (वायदे) ५९ हजार रुपये तर चांदी ७१ हजार रुपयांच्या वर पोहोचली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याची किंमतीने ५८ हजार ५५० प्रति १० ग्रॅम वर व्यवहार सुरू केला तर ऑक्टोबर सोन्याचे फ्युचर्स ०.१०% घसरून ५८ हजार ५३४ प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत आहेत.
दुसरीकडे, MCX वर चांदीचा भाव ७१ हजार १६० प्रति किलोवर उघडला आणि ७१ हजार १८९ रुपयांच्या इंट्राडे उच्चांक तर ७१ हजार १०० रुपयाच्या नीचांकी पातळीवर घसरला. सध्या MCX वर डिसेंबर चांदीचा वायदे भाव ०.४०% घसरून ७१ हजार १३४ प्रति किलो झाला आहे. त्याचवेळी सराफा बाजारात गुरुवारी, १४ सप्टेंबर रोजी सोन्याचा २२ कॅरेट भाव ५४ हजार ९९० प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट भाव ५९ हजार ९९० प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिला.
सोने खरेदी करताना काळजी घ्यावी
सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करताना नेहमी हॉलमार्क अंकित असलेले सोने खरेदी करावे. सोन्याच्या गुंतवत्तेकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला भविष्यात महागात पडू शकते. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी असते आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी हॉलमार्क जारी करते. लक्षात ठेवा की सर्व कॅरेटचे हॉलमार्क नंबर वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्ही ते पाहून आणि समजून घेऊनच सोने खरेदी करा.