लंडन: बेन स्टोक्सने बुधवारी केन्सिंग्टन ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात १२४ चेंडूत १८२ धावांची खेळी केली आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला. इंग्लंडचा संघ ४८.१ षटकात ३६८ धावांवर गारद झाला. स्टोक्सपूर्वी, इंग्लंडसाठी सर्वाधिक धावसंख्या जेसन रॉयच्या नावावर होती, ज्याने २०१८ मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८० धावा केल्या होत्या. स्टोक्सने ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये २४वी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्याही नोंदवली. त्याच्या खेळीत ९ षटकार आणि १५ चौकार मारले गेले.खास अंदाजात वडिलांची आठवण काढली या ऐतिहासिक खेळीनंतर बेन स्टोक्सने आकाशाकडे पाहताच बोटे दुमडून आपल्या ट्रेडमार्क शैलीत आनंद साजरा केला. खरं तर, हे करून त्याला त्याच्या वडिलांची आठवण होते, जे आता या जगात नाहीत. बेन स्टोक्सने डाव्या हाताचे मधले बोट वाकवून वडिलांना सलाम केला. यामागे एक प्रेरणादायी कथा आहे, न्यूझीलंडमध्ये जन्मलेले बेन स्टोक्सचे वडील गेड स्टोक्स हे रग्बी खेळाडू होते. आपले करियर कायम ठेवण्यासाठी आणि ऑपरेशन करून बाहेर बसण्याऐवजी त्यांनी आपले बोट कापून टाकले होते. त्यामुळे स्टोक्स आपल्या वडिलांच्या या संघर्षाला सलाम करत आपले मधले बोट दुमडून त्यांची आठवण काढतो.विश्वचषकापूर्वी धोक्याची घंटा पुढील महिन्यात भारतात सुरू होणाऱ्या ICC एकदिवसीय विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला स्टोक्सची एकदिवसीय निवृत्ती का मागे घ्यायला लावायची होती, हे या खेळीवरून स्पष्ट होते. इंग्लंडने १३ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. ट्रेंट बोल्टने जॉनी बेअरस्टोला खातेही उघडू दिले नाही आणि पहिल्याच चेंडूवर त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि नंतर जो रूटला बाद केले, पण स्टोक्स आणि डेविड मलान (९५ चेंडूत ९६ धावा) यांनी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि तिसऱ्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. मलानचे पाचवे वनडे शतक चार धावांनी हुकले आणि तो बोल्टचा तिसरा बळी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here