कोल्हापूर : आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून दोघा मित्रांचा वाद झाला. यातून वन कर्मचारी असलेल्या मित्राचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना काल रात्री आठ वाजताच्या सुमारास कोल्हापुरातील वारे वसाहत परिसरात घडली आहे.

वन कर्मचारी भास्कर शंकर कांबळे (वय वर्ष ५०, रा. आणाजे, ता. राधानगरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर युवराज बळवंत कांबळे (वय वर्ष २७ रा. कुडूत्री, ता. राधानगरी) असे संशियत आरोपीचे नाव आहे.

लक्ष्मी लॉजमध्ये ‘तसले’ प्रकार सुरु, पोलिसांना खबर लागली, छाप्यात ७३ वर्षीय आरोपीसह दोघं अटकेत
कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील वन कर्मचारी म्हणून काम करणारे भास्कर कांबळे आणि भाजीपाला विक्रेता असलेला युवराज कांबळे दोघात मैत्रीचे संबंध होते. ते दोघेही आपापल्या कुटुंबासह वारे वसाहत परिसरात राहत होते. दोघांची मैत्री घट्ट असल्याने परिवारात देखील मैत्री झाली होती. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय वन कर्मचारी भास्कर कांबळे यांना येत होता.

एकट्याने अश्लील व्हिडिओ पाहणं गुन्हा नाही, हायकोर्टाचं स्पष्ट मत, पण एखादा…
याचा राग त्यांच्या डोक्यात होता. याच विषयावरून दोघांत सतत वाद होत होते. हा वाद मिटवण्यासाठी बुधवारी सायंकाळी दोघे संभाजी नगर येथील एका मित्राच्या घरात एकत्र आले होते. वाद मिटलाही होता, मात्र वाद मिटवून परत जाताना वारे वसाहत येथील महादेव मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद हाणामारीवर गेला. दोघात झटापट सुरू झाली.

GST मधील नोकरी सोडून अभिनेत्री झाली, पाटलांसोबत रिलेशनशीप, आता २६४ कोटींच्या घोटाळ्यात ईडीच्या रडारवर
याच वेळी भास्कर कांबळे खाली पडलेले. त्यांच्या डोक्यात दगड घालून युवराजने त्यांचा खून केला. त्यानंतर युवराजने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here