कोलंबो : दुखापतींनी त्रस्त झालेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाने १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. फखर जमान, फहीम अश्रफ, जखमी हरिस रौफ आणि नसीम शाह यांच्या जागी मोहम्मद हारिस, सौद शकील मोहम्मद वसीम ज्युनियर आणि जमान खान यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. यासोबतच मोहम्मद नवाजही प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहे.PoK मधील गरीब मुलगा आशिया कप खेळणार पाकव्याप्त काश्मीरमध्ये जन्मलेला क्रिकेटर जमान खान या सामन्यातून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर येथील गरीब कुटुंबातील हा खेळाडू काश्मीर लीगमध्ये खेळल्यानंतर कॅनडा आणि श्रीलंकेच्या टी-२० लीगमध्ये खेळला. त्याने कोणतेही प्रथम श्रेणी सामने खेळलेले नाहीत, परंतु अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. दुखापतग्रस्त नसीम शाहच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा पाकिस्तान संघात समावेश केला.जवळपास अर्धा संघ एकाच वेळी बदललापाकिस्तान संघ व्यवस्थापनाने बुधवारी जाहीर केलेल्या अंतिम अकरामध्ये वेगवान गोलंदाज हारिस रौफ दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे निश्चित केले आहे. २२ वर्षीय जमान २०२१ मध्ये काश्मीर लीगमध्ये खेळताना प्रसिद्धीझोतात आला आणि लाहोर कलंदरने त्याला पाकिस्तान सुपर लीगसाठी आपल्या संघात समाविष्ट केले. तो इंग्लिश काऊंटी संघ डर्बीशायरकडूनही खेळला ज्याचे पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर हे मुख्य प्रशिक्षक आहेत. झमानने इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत मँचेस्टर इनव्हिन्सिबल्ससाठी सहा सामने खेळले आणि दोन विकेट्स घेतल्या.पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन: मोहम्मद हरिस, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here